Share

कोरोना नियमाचा भंग करणाऱ्या मंगल कार्यालायावर मनपाची कारवाई; थकबाकीपोटी २ टॉवर सील

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव नव्याने वाढत असताना मनपाने कोरोना संदर्भात सर्व नियम कडक केले आहेत. यात मंगल कार्यालय व खासगी कोचिंग क्लासेस वर विशेष लक्ष ठेवून आहे. पण तरिही शहरातील एका मंगल कार्यालयाने कोरोना नियमाचे भंग केल्याने मंगल कार्यालयाला दहा हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. तर दुसऱ्या कारवाईत मनपाचा कर न भरल्यामुळे दोन मोबाइल टॉवर सील केले आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील सर्व मंगल कार्यालयांना सक्त ताकीद देउनही जळगाव रोडवरील रेणुका माता मंदिरासमोर असलेल्या कलावती मंगल कार्यालयाने कोरोनाच्या नियमाचा भंग केला. यावर मनपाच्या नागरी पथकाने शुक्रवारी या कार्यालायाला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. प्रभाग अधिकारी सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख किसन निकम आणि किशोर भागवत यांनी ही कारवाई केली.

तर दुसरीकडे विशेष मालमत्ता करवसुली टास्क फोर्सने शहरातील काही भागांत कारवाई केली. यात कर थकवलेल्या दोन मोबाइल टॉवर व तीन मालमत्ता सील केल्या. या कारवाईत पथकाने ३ लाख ३७ हजार रुपये कर वसुल केला. या कारवाईत भक्तिनगर आणि नारेगाव येथील इंडस टॉवर सील करण्यात आले. तर सिडको एन-९ येथील किरण इंगळे व राधाबाई कदम यांची तर राजे संभाजी कॉलनीतील रूपल पवार यांची मालमत्ता सील करण्यात आली

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!