औरंगाबाद : मागील काही दिवसापासून कोरोनाचे रुग्ण पुन्हा वेगाने वाढत आहे. पण वाढलेल्या कोरोना रुग्णाची हेळसांड मनपाने चालवली आहे. शहरातील पदमपुरा व किलेअर्क या कोविड सेंटर वरील रुग्णांना दुपारच्या जेवणासाठी साडेतीन वाजेपर्यंत ताटकळत राहावे लागल्याने रुग्णांनी ‘काहीही करा, वाटल्यास आम्हाला तुरुंगात टाका पण येथून हलवा’ अशी सतंप्त प्रतिक्रिया रुग्णांनी दिली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा सामना करण्यासाठी मनपाने शहरातील चार कोवीड सेंटर सुरु केले आहे. या सर्व केंद्रात एकाचवेळी ७०० पेक्षा जास्त रुग्ण आहेत. या रुग्णांना पोष्टिक आहार मिळणे आवश्यक आहे. यासाठी यांना जेवण पुरवण्याची जबाबदारी अनिल जैन या ठेकेदारावर आहे. पण यापैकी दोन कोविड सेंटरवर वेळेवर जेवण मिळत नसल्याची तक्रार येथील रुग्ण करत आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजले तरी जेवण न मिळाल्याने भुकेने व्याकूळ झालेल्या रुग्णानी जेवणासाठी कोविड सेंटरच्या बाहेर पडले. बाधित रुग्ण बाहेर पडल्यामुळे डॉक्टरांनी ध्वनिक्षेपकावरुन आवाहन करुन सगळ्यांना आत बोलावले. काही वेळात जेवण आले पण तेही अपुरे पडले होते.
यावर नोडल अधिकाऱ्यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, अचानक रुग्ण वाढल्याने नियोजन करण्याल अडचण निर्माण झाली होती. या गैरसोयीनंतर संतप्त रुग्णांनी ‘काहीही करा, वाटल्यास तुरुंगात टाका पण येथून हलवा’ अशी प्रतिक्रीया दिली. या प्रकारामुळे मनपाचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे. रुग्णाच्या जेवणाची व्यवस्था करण्यात मनपा सपशेल अपयशी ठरली आहे. याकडे मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
महत्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडेकडून बीडची पालिका ‘टार्गेट’, नगराध्यक्षांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
- संजय राठोड यांच्यावर मुख्यमंत्री खरच नाराज आहेत की त्या फक्त पेरलेल्या बातम्या होत्या ?
- खरी लाज वनमंत्री संजय राठोड याला वाटली पाहिजे; रुपाली ठोंबरे यांची विखारी टीका
- आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्याकडून सायकल चालवत इंधन दरवाढीचा निषेध
- जगभरातील ७०० पेक्षा जास्त स्पर्धकांत औरंगाबादच्या वर्षा जोशी प्रथम; ठरल्या सर्वोत्कृष्ट गायिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

