Share

…म्हणून पंत मला ‘वसिम भाई’ म्हणतो ; अक्षय पटेलने केला खुलासा

Published On: 

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील आजचा दुसरा दिवस असून ही कसोटी दुसऱ्याच दिवशी संपण्याची चिन्हे आहेत. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियम मध्ये होणारी ही डे-नाईट कसोटी म्हणजे क्रिकेट प्रेमींसाठी खास पर्वणीच ठरली आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड संघात पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामना भारताने १० विकेट्सने दोन दिवसात जिंकला. भारताच्या या विजयाचा शिल्पकार ‘लोकलबॉय’ अक्षर पटेल ठरला. त्याने या सामन्यात शानदार गोलंदाजी करताना ११ विकेट्स घेतल्या. या सामन्यानंतर त्याने मुलाखत देताना त्याच्या एका टोपन नावाचा खुलासा केला आहे.

खरंतर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत यष्टीमागून अक्षरला ‘वसिम भाई, वसिम भाई’ असे म्हणत होता. त्यामुळे तो अक्षरला वसिम का म्हणतोय हा प्रश्न अनेकांना पडला होता. याचमुळे सामना संपल्यानंतर मॅच प्रसेंटेशनमध्ये मुरली कार्तिकने त्याला विचारले की पंत त्याला ‘वसिम भाई’ असं का म्हणत आहे.

त्यावर अक्षरने खुलासा केला की खरंतर हे नाव अजिंक्य रहाणेने त्याला दिले आहे आणि रिषभने हे नाव प्रसिद्ध केले आहे. अक्षर म्हणाला, ‘ते मला वसिम भाई म्हणत आहेत, कारण त्यांना वाटते की माझा आर्म बॉल हा वसिम आक्रम यांच्या प्रमाणे घातक आहे. अज्जू भाईने (अजिंक्य रहाणे) मला हे नाव दिले आणि पंतने ते पुढे चालू ठेवले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!