🕒 1 min read
ठाणे : संजय राऊत यांनी इडीबाबद पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पुरावे पाठविले आहेत. १३ पानांचं पत्र नरेंद्र मोदींकडे दिले आहे. या पत्रामधून तुम्हाला केंद्रीय तपास यंत्रणा किती भ्रष्टाचाराने पोखरलेल्या आहेत, कुणाच्या नियंत्रणाखाली काम करतात हे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. असे मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले.
अनेक लोकांनी आग्रह केला आहे की ते पत्र मी मीडियासमोर ठेवावं. ते पत्र मी देईन, संजय राऊत आज पत्रकार परिषद घेणार आहेत असेही सांगितले आहे. तसेच संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार तपास यंत्रणा राजकीय विरोधकांची कोंडी करून त्यांना अडचणीत आणत आहेत. या यंत्रणा भाजपच्या राजकारणाला हातभार लावतात. ही सर्व माहिती पत्रात आहे आणि टप्प्याटप्प्याने बाहेर येईल. आज त्यातला पहिला भाग मी बाहेर काढणार आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. लोकांचे खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी याकडेलक्ष वेधले आहे.
आजच्या पत्रकार परिषदेत तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड होणार आहे. तपास यंत्रणांवर नेमका कोणता बॉम्ब टाकणार हे संजय राऊत यांनी स्पष्ट केले नाही त्यामुळे जाणून घेण्यासाठी लोकांचे लक्ष याकडे वेधले आहे. ही सर्व माहिती संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना सविस्तर माहिती दिली.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
