🕒 1 min read
मुंबई : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार 50 हजात रुपये देणार असा निर्णय सरकाने घेतला होता. ही रक्कम अजूनपर्यंत दिली गेली नाही अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिली. परंतु यावर्षी नियमित कर्जफेड शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. याकडे लाभार्थी शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत. त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु लाभार्थ्यांना रक्कम दिली गेली नाही यावर सोमवारी विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केला होता. शेतकऱ्यांना कर्जमाफीतील लाभ कधी मिळणार? शेतकऱ्यांना नवीन कर्ज कधी दिले जाणार? हे प्रश्न देखील मुनगंटीवार यांनी सभागृहात उपस्थित केले होते.
५० हजार रुपये राज्य सरकार देणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा-
या प्रश्नांवर उत्तर देत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, कोरोनामुळे आर्थिक स्थिती बिघडली व नियोजनही बिघडले पण लवकरच यावर मार्ग काढू. यांच्या उत्तराने विरोधी नेत्यांचे समाधान न झाल्यामुळे यांनी योग्य उत्तराची मागणी केली. आणी यावर्षी या नियमित कर्जफेड करणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार आहे. अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. या घोषणेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळालेला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
