Share

जर्मन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला मंगळवार पासून सरुवात; सिंधू, श्रीकांत यांच्या कामगिरीकडे लक्ष

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : जर्मन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला मंगळवार पासून सरुवात होणार आहे.  त्यामुळे दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी व्ही सिंधू, जागतिक रौप्यपदक विजेता किदाम्बी श्रीकांत आणि युवा लक्ष्य सेन हे त्रिकुट या स्पर्धेत कोणती कमाल दाखवणार. याकडे सर्व भारतीय क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

अव्वल ३०० दर्जाच्या या स्पर्धेद्वारे अनुभवी सायना नेहवाल, पारुपल्ली कश्यप आणि एचएस प्रणॉयसुद्धा पुनरागमन करणार आहेत. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत सिंधूचा थायलंडच्या बुसाननशी सामना होईल. तर सायनाचा सिंगापूरच्या जिआ मिनशी सामना होणार आहे.

पुरुष एकेरीत श्रीकांत पहिल्या फेरीत फ्रान्सच्या ब्राइस लेव्हेर्डेझचा सामना करेल. तर २० वर्षीय लक्ष्य थायलंडच्या केंटाफोन वांगविरुद्धच्या लढतीने आपल्या पहिल्या सामन्याचा प्रारंभ करेल.

पुरुष दुहेरीत सात्विक-साइराज व रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. भारताच्या या तिसऱ्या मानांकित जोडीचा पहिल्या फेरीत चीनच्या ल्यूयू चेन आणि क्वान यी यांच्याशी भिडत होईल. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी तर मिश्र दुहेरीत इशान भटनागर-तनिषा क्रॅस्टो व साई प्रतीक-सिक्की रेड्डी या जोडय़ा भारताचे प्रतिनिधित्व करतील.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!