🕒 1 min read
नाशिक : शेतकऱ्यांची बोगस किटकनाशकांमधून फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानभरपाई भरावी लागत आहेत. आर्थिक तोटा तर ते होतोच आहे यासोबत पिकांचे देखील नुकसान होत असताना पहावे लागत आहेत. या बोगस औषधांवर तातडीने बंदी घाला अशी मागणी जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. तर यावर निर्णय काय येतोय याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
शेतकऱ्यांची गरज पाहून बोगस औषधांचा वापर –
भाजीपाला आणि द्राक्षे ही पिके मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. असे असताना या पिकांना रोगप्रतिबंधक औषधांची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागत आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं मोठा तोटा होत आहे. आर्थिक बजेट बिघडत आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांची गरज पाहून बोगस औषधांचा वापर केला जात आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. कमी किंमतीत पण जास्त प्रभावी आहे असे सांगतात. व हे एजंट अंधारात पुरवठा करत आहे. गरजेच्या औषधांची कुठलीही गुणवत्ता, दर्जा न तपासता शेतक-यांची व शासनाची फसवणूक केली जात आहे.
कृषी विभागाला बोगस औषधांचा पुरवठा कसा चालतो याची माहिती असू शकते. जिल्हयामध्ये औषधे वितरकांची संख्या प्रचंड आहे असेही शेतकरी सांगत आहे. त्यामुळे त्यांचीही दिशाभूल होत आहे. या बोगस औषधांच्या विक्रीवर बंदीची मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी करत आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
