Share

कौतुकास्पद; 22 हजार मातीच्या कुंड्यांचा वापर करत फुलवली तिघांनी फुलशेती

Published On: 

कळंब : कळंब तालुका हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखतात. हा भाग पारंपरिक भाग म्हणून असाही ओळखला जातो. परंतु आता बदलत्या काळानुसार येथील तरुणही बदलत आहेत. याठिकाणी आता तरुण नवप्रयोग देखील करत असताना पाहायला मिळते.

बोर्डा येथे तीन तरुणांनी तब्बल 30 गुंठे क्षेत्रात 22 हजार मातीच्या कुंड्यांचा वापर करत फुलशेती फुलवली. यामध्ये मातीच्या बेडचा वापर केला नाही. शीतल आणि दिनेश या चव्हाण बंधूंनी आपले शेजारी मित्र शांतीलिंग करंडे यांच्यासमवेत यावर्षी पुन्हा एका नव्या प्रयोगाला आकार दिला आहे. यामध्ये प्रचलित पद्धतीने नव्हे तर नव्या ‘टेक्निक’ चा वापर करत पॉलिहाऊसमध्ये जरबेरा फुलवायचा या तिघांनी मिळून निश्चय केला होता.

मातीच्या बेडऐवजी या तिघांनी फुलदाणी म्हणून वापरण्यात येणाऱ्या कुंडीचा वापर केला. चव्हाण व करंडे यांनी आपल्या 30 गुंठे क्षेत्रासाठी बेळगाव येथून मातीच्या ‘लाईट वेट’ 22 हजार 500 कुंड्या आणत त्या लोखंडी स्टॅण्डवर बसविल्या गेल्या. यावर पुढे शेती फुलवली आहे. यातून त्याची मेहनत कमी व उत्पन्न चांगले मिळणार असे दिसत आहे. हा प्रयोग आगळा वेगळा ठरला आहे. चर्चा देखील अनेक शेतकऱ्यांमध्ये होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!