मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) ६ मार्च रोजी पक्षाच्या मेळाव्यानिमित्त उस्मानाबाद दौऱ्यावर आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) व धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे देखील उपस्थित होते. दरम्यान, यावेळी केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात येणाऱ्या कारवायांवरुन बोलत असतांना धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच ईडीची इज्जत ठेवली नाही ईडी पेक्षा शेतकऱ्यांच्या खिशातल्या गणेश बिडीची किंमत जास्त आहे, असे मुंडे म्हणाले. दरम्यान, मुंडे यांच्या टीकेवर आता भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात निलेश राणे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘धनंजय मुंडे आपण ED आणि BD ची चिंता करू नका, तुम्ही तुमच्या खाजगी कार्यक्रमाची कधी CD निघाली तर तुमचे वांदे होतील त्याची काळजी करा’, असा सल्ला निलेश राणे यांनी धनंजय मुंडे यांना दिला आहे.
धनंजय मुंडे आपण ED आणि BD ची चिंता करू नका, तुम्ही तुमच्या खाजगी कार्यक्रमाची कधी CD निघाली तर तुमचे वांदे होतील त्याची काळजी करा.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 7, 2022
दरम्यान, भाजपच्या अंगातला माज गेला नाही, होत्याच नव्हत आणि नव्हत्याच होत केले तरी मोठ्या मोठ्या लोकांच्या मागे इन्कम टॅक्स काय ईडी काय सुरु आहे. ईडीची इज्जत ठेवली नाही ईडी पेक्षा शेतकऱ्यांच्या खिशातल्या गणेश बिडीची किंमत जास्त आहे. यांना वाटतंय आपण त्यांना झुकवू शकतो. भाजपची खरी जिरवायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत दाखवून द्या. परत भाजप महाराष्ट्राच्या मातीत अशा प्रकारचा नाद करणार नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :
- “…पण पंतप्रधान पदाची खुर्ची आपल्या नशिबी येणार नाही”, पवारांच्या टीकेवर सदाभाऊ खोत यांचे प्रत्युत्तर
- स्टिव्ह स्मिथ ठरला सचीनला वरचढ; असा कारनामा करणारा जगातील एकमेव फलंदाज
- अश्विनला परदेशी भूमीवर खेळवण्याच्या प्रश्नावर रोहितचे भन्नाट उत्तर म्हणाला…
- कौतुकास्पद; 22 हजार मातीच्या कुंड्यांचा वापर करत फुलवली तिघांनी फुलशेती
- “तो सध्या कसोटीमध्ये पृथ्वीवरील सर्वात श्रेष्ठ ऑल राऊंडर” आकाश चोप्राने केले जडेजाचे कौतुक


