Share

‘घोटाळे उघडकीस आणून तुम्ही राष्ट्रावर उपकार केलेत’, राऊतांकडून सोमय्यांचे कौतूक!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा ‘ स्कॅम क्रूसेडर ‘ असा उल्लेख करत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी एक पत्रच सोमय्या यांना धाडलं आहे. भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातील घोटाळ्याकडे या पत्राच्या माध्यमातून सोमय्या यांचे लक्ष वेधून ईडीपर्यंत हे प्रकरण पोहचवण्याची विनंती राऊत यांनी केली आहे. घोटाळ्याच्या फाइलचा अभ्यास करून तुम्ही लवकरच मोठा गौप्यस्फोट कराल अशी अपेक्षा आहे, असेही राऊत यांनी पुढे पत्रात नमूद केले आहे.

तर भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांची उघड केली, हे राष्ट्रावर उपकार असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांचे कौतूक केल्याचे समोर आलेय. या आशयाचे पत्र राऊत यांनी सोमय्यांना पाठवले आहे. किरीट सोमय्या यांनी स्वत: हे पत्र शेअर करत संजय राऊत यांचे आभार मानले. ‘माननीय संजय राऊत यांनी माझ्या ‘भ्रष्टाचार विरोधी मिशनचे कौतुक केले, मी त्यांचा आभारी आहे…..’ असं म्हणत सोमय्या त्यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.

‘भ्रष्टाचार, शासकीय पैशांचा अपहार अशी अनेक प्रकरणे आपण सार्वजनिकरीत्या समोर आणली आहेत. हे राष्ट्रावर उपकारच झाले. आपण केलेल्या तपासकार्यामुळे राज्यातील अनेक लोकप्रतिनिधींना तुरुंगात जावे लागले. भ्रष्टाचारविरुद्धच्या आपल्या लढ्यास ‘बळ’ मिळावे’ असे राऊत यांनी या पत्रात म्हटलं आहे. तर आपण लवकरच आपण यावर प्रतिक्रिया देऊ असे सोमय्या यांनी सांगितले आहे.

किरीट सोमय्या हे सातत्याने महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करत आहेत. सरकारमधील अनेक मंत्र्यांवर व अन्य नेत्यांवर त्यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन काहींची सक्तवसुली संचालनालय व इतर केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशीही सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्र पाठवले आहे. राऊत यांनी सोमय्या यांना लिहिलेल्या पत्रात पिंपरी चिंचवड पालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात ५०० ते ७०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा केला या घोटाळ्याचे पुरावे असलेली संपूर्ण फाइल मी तुमच्याकडे सोपवत आहे, असे नमूद करताना त्याचे कारणही राऊत यांनी पुढे नमूद केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!