Share

‘मोदी सरकारने पीक विम्याचा हप्ता रोखला’, सचिन सावंत यांचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : पीक विमा, मराठा आरक्षणप्रश्नी भाजपकडून दिशाभूल करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. अद्याप पीक विम्याचा हप्ता जमा केला नाही. हे पहिल्यांदाच घडत आहे, असा आरोप काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला.

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आल्यानंतर सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, पीक विम्यासंदर्भात गैरसमज पसरवण्यात येत आहे. परतावा देण्याचे काम विमा कंपन्या करतात. मागील फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना विम्याचा परतावा नेहमीच कमी मिळाला आहे. हप्त्याच्या पलिकडे जाऊन कधीच परतावा मिळाला नाही. महाविकास आघाडी सरकाच्या काळात २०१९-२० या वर्षात विम्याचे ४ हजार ९२२ कोटी रुपये जमा झाले होते. यावेळी ५ हजार ५३७.२८ कोटींचा परतावा दिला होता. केंद्र सरकारचे अजूनही पूर्ण पैसे जमा झाले नाहीत.

केंद्र सरकार महाराष्ट्राला मदत करत नाही. गुजरातला पंतप्रधान मोदी यांनी तेथे जाऊन लगेच मदत जाहीर केली. राज्यात पिक विम्याचा बीड पॅटर्न राबवण्याची परवानगी का दिली जात नाही. विमा कंपन्या मोदी सरकारच्या जावई आहेत का? अनेक राज्य विमा कंपनीतून बाहेर पडली पण, आम्हाला बाहेर पडू दिले जात नाही, असा आरोप सावंत यांनी केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!