नागपूर : जगासाठी सर्वात मोठा धोका हा धार्मिक, आर्थिक, राजकीय आणि वैद्यकीय दहशतवादापासून आहे, असा इशारा योगगुरू स्वामी रामदेवबाबा यांनी दिला. नागपुरात आयोजित ‘धार्मिक सौहादार्बाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका’ या विषयावरील राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत ते बोलत होते.
या परिषदेला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते गुरुदेव श्रीश्री रविशंकर, नवी दिल्ली येथील अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी, अजमेर शरीफ दर्ग्याचे गद्दीनशीन हाजी सईद सलमान चिश्ती, मुंबईच्या जीवनविद्या मिशनचे संस्थापक प्रल्हाद वामनराव पै, मुंबईचे आर्चबिशप कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेसियस, लेह-लडाख येथील महाबोधी आंतरराष्ट्रीय तपसाधना केंद्राचे संस्थापक भिक्खू संघसेना आदी हजर होते.
रामदेव बाबा म्हणाले, राजकीय दहशतवाद सर्वात वर तर धार्मिक दहशतवाद दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्व धर्म नाही तर सर्व पंथ असे नाव असायला हवे. पाण्याचा एक धर्म, आगीचा एक धर्म, वाऱ्याचा एक धर्म असतो. त्यामुळे सर्व मानव जातीचा धर्म हा एकच असणार. आम्ही सर्वांना हिंदू करू, मुस्लिम करू, ख्रिश्चन करू यापेक्षा आम्ही सर्वांना माणूस म्हणून घडवू, असे म्हटले पाहिजे. आम्ही सारे एक आहोत असा एकच सूर सर्व जगातील धर्माचार्यानी लावला तर चांगले होईल. ब्राह्मण महान, ओबीसी महान, क्षत्रिय महान, शूद्र महान, हे वाईट आहे. आपण सारे एक आहोत. ज्ञान, तंत्रज्ञान, संशोधनाचा वापर मानवाच्या विकासासाठी करणे हा धर्म आहे. धर्माच्या नावावर ‘रामनाम जपना पराया माल अपना’ हा कोणता संन्यास आहे, असा सवाल त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- वर्ल्ड कपमध्ये प्रथमच भारताचा पाकिस्तानकडून लाजिरवाणा पराभव!
- एनसीबीद्वारे केंद्राकडून राज्याला बदनाम करण्याचा डाव; छगन भुजबळांचा मोदी सरकारवर निशाणा
- भुजबळांनी नांदगावच्या जागेचा नाद सोडावा, राऊतांचा सल्ला
- …म्हणून मोदी सरकार पेट्रोलचे दर कमी करणार नाही; पृथ्वीराज चव्हाणांची केंद्र सरकारवर टीका
- ‘दिलेले पॅकेजही तोकडे, पण ती मदतही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा’, भाजपची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

