🕒 1 min read
मुंबई: राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यावर नेहमीच आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे दिसत आहे. सध्या आर्यन खान प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावरूनआता पुन्हा एकदा भाजपकडून ठाकरे सरकारवर टीका करण्यात आली आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत जगातील आठवे आश्चर्य असल्याचा टोला लगावला आहे.
यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ‘स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्याला दोष देण्याचा हा प्रकार सध्या सुरु आहे. मला व्यक्तिगतरित्या वाटते की थांबले पाहिजे आता, राजकारणामध्ये सर्वात गलिच्छ कार्यक्रम सुरु आहे. स्वतःचे केलेले पाप झाकण्यासाठी दुसऱ्याकडे बोट दाखवायचे हर्बल वनस्पती गांजाचे नवीन नाव मी ऐकत आहे. जनतेचा विश्वासघात करत आणि जनतेला धोका देऊन हे सरकार स्थापन झाले आहे. गेल्या दोन वर्षात महाराष्ट्र कर्णधार यांनी एकही दिवस मंत्रालयात न जाण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. याची देखील नोंद केली पाहिजे. सात अजुबे इस दुनिया के आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं, या शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
दरम्यान, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आता थेट मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. गेल्या दोन वर्षांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात गेलेच नाहीत. असा घणाघात त्यांनी केला आहे. मात्र सार मंत्रीमंडळ आर्यन खानच्या मागे आहे. हे राज्य वसुलीखोरांचे गांजाडांचे आहे. शरद पवार म्हणतात आर्यन खानने गांजा ओढला नाही. तो हर्बल गांजा आहे. तो आम्हला द्या आम्ही ही श्रीमंत होऊ. गांजा तुम्ही आणला आम्ही नाही. त्यामुळे हे राज्य वसुलीखोरांचे गांजाडांचे आहे. अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- वर्ल्ड कपमध्ये प्रथमच भारताचा पाकिस्तानकडून लाजिरवाणा पराभव!
- एनसीबीद्वारे केंद्राकडून राज्याला बदनाम करण्याचा डाव; छगन भुजबळांचा मोदी सरकारवर निशाणा
- भुजबळांनी नांदगावच्या जागेचा नाद सोडावा, राऊतांचा सल्ला
- …म्हणून मोदी सरकार पेट्रोलचे दर कमी करणार नाही; पृथ्वीराज चव्हाणांची केंद्र सरकारवर टीका
- ‘दिलेले पॅकेजही तोकडे, पण ती मदतही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा’, भाजपची मागणी

