सोलापूर : भाजपविरोधात बोलणाऱ्यावर केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून कारवाई होत आहे. अनेकांना ईडीची भीती दाखवण्यात येत आहे. ईडी म्हणजे पान तंबाखूच्या दुकानासारखे झाले आहे. भाजप सरकारच्या काळात ईडी,सीबीआय सारख्या स्वायत्त संस्थांचा वापर हा राजकारणासाठी केला जात आहे. त्यामुळं भाजपच्या विरोधात बोललात तर तुमच्या घरी केंव्हाही ईडीची धाड पडू शकते. तशी ती माझ्या घरीही पडू शकते. अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आ.प्रणिती शिंदे यांनी केलीय. त्या सोलापुरातील एका सभेत बोलत होत्या.
आमदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. शिंदे म्हणाल्या, देशात सध्या असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. अनेकजण दशहतीखाली आहेत. काहींनी स्वत:ला घाबरून स्वत:ला कोंडून घेतले आहे. दुसऱ्यामध्ये भांडण लावून स्वत:चा स्वार्थ साधण्याची खेळी भाजपची आहे. कर्नाटकात धर्मनिरपेक्ष पक्ष एकजुटीने पुढे उभे राहिलेत. पैशाच्या धुंदीत त्यांनी विरोधी आमदारांना विकत घेण्याचा खटाटोप सुरू आहे. शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालणार मोकाट फिरत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
प्रणिती शिंदे यांनी यावेळी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीवरही टीका केली. हे दोन्ही पक्ष काहीच काम करत नाहीत, ते केवळ भाजपासाठी काम करतात. लोकांना पेटवायचं आणि भांडणं लावायची हे काम त्यांच्याकडून सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- वर्ल्ड कपमध्ये प्रथमच भारताचा पाकिस्तानकडून लाजिरवाणा पराभव!
- एनसीबीद्वारे केंद्राकडून राज्याला बदनाम करण्याचा डाव; छगन भुजबळांचा मोदी सरकारवर निशाणा
- भुजबळांनी नांदगावच्या जागेचा नाद सोडावा, राऊतांचा सल्ला
- …म्हणून मोदी सरकार पेट्रोलचे दर कमी करणार नाही; पृथ्वीराज चव्हाणांची केंद्र सरकारवर टीका
- ‘दिलेले पॅकेजही तोकडे, पण ती मदतही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा’, भाजपची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
