मुंबई : सध्या राज्यात मुंबईतील ड्रग्ज पार्टी प्रकरण व आर्यन खान वरून राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. यामध्ये एकीकडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक तर दुसरीकडे भाजपा नेते एकत्र मिळून भिडले आहेत. त्यातच आता नवाब मलिक यांनी केलेल्या ट्विटला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी रिट्विट करत हिंदी शेर ने उत्तर दिले आहे.
दारिया की बाते, नाले कर रहे है
देख लो यारो, गधे घोडे दौडा रहे है… pic.twitter.com/5ryh43pqnC— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 25, 2021
‘दश्त-तो-दश्त हैं, दरिया भी न छोड़े हमने। दहर-ए-ज़ुल्मात में दौड़ा दिये घोड़े हमने।’ असे ट्विट राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले होते. त्याला भाजपनेते अतुल भातखळकर यांनी ‘दारिया की बाते, नाले कर रहे है, देख लो यारो, गधे घोडे दौडा रहे है…’ असे उत्तर अतुल भातखळकर यांनी दिले आहे.
दश्त-तो-दश्त हैं, दरिया भी न छोड़े हमने। दहर-ए-ज़ुल्मात में दौड़ा दिये घोड़े हमने।
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 24, 2021
सध्या एका बाजुला आर्यन खानच्या बाजुने नवाब मलिक तर दुसरीकडे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना सपोर्ट करताना भाजप नेते एकमेकांवर प्रचंड टीका करत आहेत. या प्रकरणावर दररोज नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज समोर आलेल्या एका व्हिडिओन खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- वर्ल्ड कपमध्ये प्रथमच भारताचा पाकिस्तानकडून लाजिरवाणा पराभव!
- एनसीबीद्वारे केंद्राकडून राज्याला बदनाम करण्याचा डाव; छगन भुजबळांचा मोदी सरकारवर निशाणा
- भुजबळांनी नांदगावच्या जागेचा नाद सोडावा, राऊतांचा सल्ला
- भारताविरुद्ध पहिल्यांदाच जिंकल्याचा अभिमान : शाहीन आफ्रिदी
- “इस दुनिया का आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं”; मुनगंटीवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

