Share

खाजगीत जाण्याची ऐपत नाही, सरकारी रुग्णालय भरती करून घेईना! पॉझिटिव्ह रुग्णाची आपबिती

Published On: 

औरंगाबाद : जसजशी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे तसतसे रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी वाळूजमधील पॉझिटिव्ह आलेल्या एका रूग्णास उपचारासाठी वाळूज ते चिकलठाणापर्यंत फरफट करावी लागली. त्यानंतरही त्यास दाखल करून न घेता तेथून घाटीत परतविण्यात आले. खाजगीत जाण्याची ऐपत नाही आणि सरकारी रुग्णालय भरती करून घेईना या परिस्थितीत शेवटी हताश रुग्णाने गावाकडची वाट धरली.

यासंदर्भात एक व्हिडिओ बुधवारी दिवसभर सोशल मिडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओतील उतरेश्वर रामराव चौधरी यांचा बुधवारी सकाळी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. कंपनी कामगार असल्याने उपचारासाठी ते पंढरपूर ईएसआय रुग्णालयात गेले होते. मात्र यांना तिथून वाळूज रुग्णालयात जावे, असे सांगण्यात आले. वाळूज रुग्णालयातही बेड्स उपलब्ध नसल्याने त्यांना चिकलठाणा येथील ईएसआयमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला.

मात्र पॉझिटिव्ह रुग्ण असूनही त्यांना अ‍ॅम्बुलन्स उपलब्ध करुन देण्यात आली नाही. त्यामुळे चौधरी यांनी आपल्या दुचाकीवरुन वाळूजपासून प्रवास करीत सकाळी ११ वाजता चिकलठाणा गाठले. मात्र, तिथेही त्यांना ग्रामीणचा रुग्ण असल्याचे सांगत भरती करुन घेण्यास नकार देण्यात आला. उलट सिव्हिल रुग्णालय किंवा घाटीत जावे, असे सांगण्यात आले.

मात्र उपचारासाठी अर्धा दिवस फरफट झाल्याने हताश होऊन ते रुग्णालयाच्या आवारातच बसले. तब्बल दोन-तीन तास प्रतिक्षा करुनही त्यांना कुणीच प्रतिसाद दिला नाही. सांयकाळी त्यांच्याशी संपर्क केला असता खासगीत रूग्णालयात जाण्याची आपली ऐपत नसून आपल्या गावी अंबोजोगाईला निघाल्याचे त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!