औरंगाबाद : रेल्वे खात्यामध्ये तिकीट तपासणीस म्हणजेच टिटि या पदाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्रे देऊन तिघांची १६ लाखांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात सिडको पोलीसांनी दोघांना सोमवारी रात्री अटक केली. आरोपींना शुक्रवारपर्यंत (दि.२६) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम. कादरी यांनी दिले आहेत.
अनिकेत कैलास कोकाटे ( श्रीरामपुर जि. अहमदनगर) आणि महेश कारभारी ससे (२६, रा. ससेवाडी ता.जि. अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत. एका उर्दु शाळेत शिपाई पदावर गेल्या पंधरा वषार्पासून नोकरी करत असलेल्या भरत नवनाथ खेडकर (एन-११, हडको) याची जुलै २०१८ मध्ये पुणे ते औरंगाबादच्या बस प्रवासात अनिकेत कोकाटे याच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी कोकाटेने दिल्लीतील रेल्वे भवनात नोकरीला असून, तेथे तिकीट तपासणीस पदाच्या जागा आमच्या कोट्यातून भरल्या जात आहेत. तेव्हा कोणाला नोकरी लावायची असेल तर सांगा असे म्हणाला.
तेव्हा खेडकर यांनी नातेवाईक विशाल तुकाराम ताठे व सुनील विठ्ठल नागरे (दोघेही रा. घाटनांद्रा, ता. सिल्लोड) यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही नोकरीसंदर्भात माहिती दिली. तेव्हा दोघांनी कोकाटे याच्याकडून सविस्तर माहिती घ्या असे खेडकर यांना सांगितले. नंतर प्रत्येकी दहा लाख रुपये लागतील असे सांगितले. मात्र, तडजोडीअंती प्रत्येकी आठ लाख देण्याचे ठरले.
मात्र पुढे संशय आल्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली. त्यावर चौकशीअंती वरील दोघा आरोपींना अटक करण्यात आले. नंतर त्यांनी, गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार आरोपी सौरभ श्रीधर तिवारी (रा. बबनगहुआ ता. झोबारा जि. सुलतानपुर उत्तरप्रदेश) यांच्या साथीने गुन्हा केल्याचे कबुल केले. दरम्यान दोघा आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहाय्यक सरकारी वकील निता किर्तीकर यांनी बाजू मांडली.
महत्त्वाच्या बातम्या
- नाराज पेट्रोल पंप संघटना घेणार जिल्हाधिकाऱ्यांची भेट
- शहरातील रस्ते कामांची गुणवत्ता तपासण्याचे केंद्रीय अवर सचिवांचे आदेश
- ‘…तेव्हा तपास योग्य झाला असता तर आज पर्यावरण मंत्री वेगळा असता’
- मराठा आरक्षण : अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतली साष्टपिंपळगाव ग्रामस्थांची भेट
- मराठा आरक्षण : अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतली साष्टपिंपळगाव ग्रामस्थांची भेट


