Share

‘आपली ही चोरी नेमकी पकडली गेलीच कशी याचीच चिंता संपूर्ण मंत्रीमंडळाला आहे’

Published On: 

मुंबई – राज्यातल्या सद्य घडामोडीनंतर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या सर्व भ्रष्ट व्यवहारांची चर्चा होण्याऐवजी या सगळ्या गोष्टी बाहेर आल्याच कशा याचीच चिंता संपूर्ण मंत्रिमंडळाला लागल्याचे चित्र बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत पाहायला मिळाले. अंतिमत: चोर सोडून संन्यासाला फाशी देण्यासारखी कृती ठाकरे सरकार करताना पाहायला मिळत असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरूवारी केली.

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपाध्ये म्हणाले की, माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचे गृहमंत्र्यावर 100 कोटीची खंडणी वसूलीचे आदेश देण्याच्या आरोपा संदर्भातले पत्र, माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणलेले पोलिस खात्यातील बदल्यांचे रॅकेट या सगळ्या गोष्टीनंतर संबंधित मंत्र्यांची, अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याऐवजी या सगळ्या आतल्या गोष्टी बाहेर पडल्याच कशा? आपली ही चोरी नेमकी कशी पकडली गेली याचीच चिंता संपूर्ण मंत्रीमंडळाला आहे.

रश्मी शुक्ला यांच्यासारख्या महिला अधिकाऱ्यांनी रीतसर परवानगी घेऊन केलेले फोन टॅपिंग त्यामधून समोर आलेली माहितीच्या अहवाला नंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: गांभीर्याने लक्ष घालुन कारवाई करणे अपेक्षीत होते. मात्र त्यांनी तो अहवाला गृहमंत्र्यांना पाठवला. आता वर्षभरानंतर हाच अहवाल विरोधी पक्षनेत्यांनी जनतेसमोर आणल्यानंतर स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणारी ही आघाडी रश्मी शुक्ला सारख्या महिला अधिकाऱ्यांचे हनन करून भ्रष्ट मंत्र्यांना व अधिकाऱ्यांच्या चुकांवर पांघरूण घालत आहे, हे दुर्दैवी आहे असे उपाध्ये म्हणाले.

उपाध्ये म्हणाले की, माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका ही आता उच्च न्यायालयात दाखल केली जाणार आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असुन यामध्ये देशमुख यांना प्रतिवादी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार उच्च न्यायालयातल्या याचिकेतल्या सुनावणीमध्ये महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी प्रतिवादी म्हणून आपली भूमिका मांडणे हे महाराष्ट्राला शोभणारे आहे का असा सवाल उपस्थित केला.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 21 मार्चला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलेले. या पत्राला आज चार दिवस उलटले तरीही मुख्यमंत्र्यांची त्या पत्राची दखल घेतेलेली नाही. ज्या दरबारात गृहमंत्र्यांच्या पत्राची दखल घेतली जात नाही तेथे सामान्यांचे प्रश्न कसे सोडवले जाणार असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!