Share

नाराज पेट्रोल पंप संघटना घेणार जिल्हाधिकाऱ्यांची भेट

Published On: 

औरंगाबाद : शहरात लागू करण्यात आलेल्या अंशतः लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या तीन पेट्रोलपंपावर दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी कारवाई केली आहे. दरम्यान, याबाबत पेट्रोलपंप चालक संघटनेचे म्हणणे आहे कि अत्यावश्यक सेवांमध्ये नेमके कोणाकोणाला धरावे? याबाबत सर्वच पेट्रोलपंप चालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासनाने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता थेट पेट्रोल पंप सील केल्याने याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

कोरोना रुग्ण वाढीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने ११ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत अंशतः लॉकडाऊन लागू केले आहे. दरम्यान रात्री ८ ते सकाळी ५ यावेळेत बाहेर निघण्यास बंदी आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवांनाच परवानगी दिली आहे. या दृष्टीने पेट्रोलपंपानादेखील रात्री केवळ अत्यावश्यक सेवा असलेल्यांनाच पेट्रोल देण्यास परवानगी दिली आहे.

मात्र बाबा पेट्रोल पंप, सेव्हन हिल, हर्सूल टि पॉईंट येथील पेट्रोल पंपांकडून येणाऱ्या सर्वांना पेट्रोल दिले जात असल्याचे खुद्द जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांच्या पाहणीत समोर आले. कोरोना नियमांचे पालन होतेय का ? हे बघण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता हे शहराचा फेरफटका मारत होते. त्यावेळी पेट्रोल पंपावर होणाऱ्या नियमांचे उल्लंघन निदर्शनास येताच तात्काळ कारवाई करत संबंधित पेट्रोल पंप सील करण्यात आले. यामुळे शहरातील तिन्ही पेट्रोल पंपांना सिल करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!