मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे मागील काही दिवसांपासून फरार आहेत. दोघांचाही शोध पोलिसांना लागत नाही. याबाबत भाजपाने आघाडी सरकार व पोलिसांवर टीका करत आहे. यातच आता राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी याच मुद्द्यावरुन परमबीर सिंह आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. मीसेस फडणवीसांच्या टीकेला शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदेंनी उत्तर दिलं आहे.
तुम्हाला भाजपकडून आमदार व्हायचंय, त्यामुळे तुम्ही अस्वस्थ आहात. बरं राहिला प्रश्न देशमुखांचा तर तुमच्याकडे विविध तपास यंत्रणा तुम्ही शोधू शकताय ना, अशा शब्दात मनीषा कायंदेंनी अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.
सामनातून भाजपवर टीका होत असताना अमृता वहिनी मात्र अस्वस्थ होतात. आमच्याकडे तर अशी माहिती आहे की अमृता वहिनींना भाजपकडून आमदार व्हायचंय, प्रवक्ता व्हायचंय. त्यासाठी त्या भाजपवर दबाव आणत आहेत, असं मनिषा कायंदे म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- … म्हणून चिखलीच्या नगराध्यक्षांसह पतीची भाजपातून करण्यात आली हकालपट्टी
- याला राज्य सरकारच दोषी; रावसाहेब दानवेंनी कोळसा टंचाईचं फोडलं खापर ठाकरे सरकारवर
- ‘…हे कुठले डॉन आहेत का?’; जास्मिन वानखेडेंवरील आरोपानंतर मनसे आक्रमक
- ‘आज हमारी तो कल तुम्हारी बारी’; ईडी कारवाईवरुन विजय वडेट्टीवारांचे चंद्रकांत पाटलांना उत्तर
- ‘तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म! आहे ते फक्त हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेले मुख्यमंत्रिपद’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
