Share

‘आज हमारी तो कल तुम्हारी बारी’; ईडी कारवाईवरुन विजय वडेट्टीवारांचे चंद्रकांत पाटलांना उत्तर

Published On: 

नांदेड : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नेत्यांच्या विरोधात तसेच नेत्यांच्या निकटवर्तीयांच्या विरोधात ईडीकडून कारवाई सुरू आहे. या कारवाईवरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. आज आमची तर उद्या तुमची वेळ असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना आव्हान दिलं आहे.

ईडीची पुढची कारवाई नांदेडला होणार असल्याचे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्यावरून विजय वडेट्टीवार यांनी पाटील यांना आव्हान दिले. विजय वडेट्टीवार म्हणाले, नांदेड की बारी…. काही हरकत नाही, उद्या तुमची बारी असेल. सत्ता कोणाच्या बापाची नेहमीसाठी नसते लक्षात ठेवा. सत्ता बदलत असते आणि सगळ्यांची घर काचेची आहेत. किमान खिडकी तरी काचेची असते. दगड तर पडणारच, असं म्हणत विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभेची पोटनिवडणुक सुरू आहे. देगलूरमध्ये आयोजित प्रचार सभेत विजय वडेट्टीवार यांनी हे विधान केले आहे. ‘केंद्रात आमची सत्ता आल्यास आम्ही देखील अशीच कारवाई करू’, असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!