चिखली – भारतीय जनता पक्षाच्या हाती असलेल्या चिखली नगरपालिकेमध्ये पक्षाच्याच नगराध्यक्षाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, गैरकारभार आणि दादागिरी केल्याच्या कारणावरून नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे आणि त्यांचे पती कुणाल बोंद्रे याची भाजपामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी पत्रकार परिषद आयोजित करून आज या निर्णयाची घोषणा केली.
दरम्यान, दुसरीकडे नगराध्यक्ष च्या माध्यमातून शहरात अनेक विकास कामे करण्यात आली, आणि त्यामुळे त्यांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळतोय मात्र या सर्व कामांचे श्रेय हे स्थानिक आमदार श्वेता महाले आणि त्यांच्या पतींना घेता येत नसल्याने निराशेपोटी त्यांनी हा केविलवाणा प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया कुणाल बोंद्रे यांनी दिली आहे.. तर पक्षातून निष्कासित केल्याचे कुठलेच पत्र अद्यापपर्यंत आम्हाला पोहोचले असून हे फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून समजले आहे, आणि नगराध्यक्षा विरोधात आतापर्यंत एकही भ्रष्टाचाराची झालेली नसून भ्रष्टाचाराचे आरोप कुणाल बोन्द्रे त्यांनी फेटाळून लावले आहेत. दोन दिवसांमध्ये या सर्वांच्या बाबतीत पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.
गेल्या पाच वर्षांपूर्वी 2016 मध्ये पार पडलेल्या नगर पालिका निवडणूकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर प्रिया कुणाल बोंद्रे ह्या थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. शिवाय 26 पैकी 13 स्वपक्षीय सदस्यांसह शिवसेना – 1, राष्ट्रवादी काँग्रेस – 2 आणि एका अपक्ष सदस्याने भाजपाला पाठिंबा दिला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचारसभेत दिलेल्या आश्वासनानुसार कोट्यवधी रुपयांचा निधी चिखली नगर पालिकेला दिला. परंतु, नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे आणि त्यांचे पती कुणाल बोंद्रे यांनी या निधीचा जनतेच्या हितासाठी पारदर्शीपणे वापर केला नाही, असा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला.
निकृष्ट दर्जाची कामे, मनमानी कारभार, कुणाल बोंद्रे यांचा कामकाजात अवाजवी हस्तक्षेप आणि अरेरावीची वागणूक या गोष्टींबद्दल त्यांना यापूर्वी वारंवार समज देण्यात आली, मात्र त्यांनी आपल्या कारभारात सुधारणा न केल्यामुळे त्यांना पक्षातून निष्कासित करण्यात येत असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी जाहीर केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी आठ तास अखंडीत वीज द्या, अन्यथा रास्तारोको आंदोलन करू’
- ‘मुंबई मनपाच्या पैशांचा शिवसेनेकडून पक्षनिधी म्हणून वापर’, बाळा नांदगावकर यांचे आयुक्तांना पत्र
- उद्यापासून नाट्यगृहे पुन्हा सुरु होणार, मात्र ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन
- विराट कोहलीच्या ‘या’ कृत्यामुळे रोहितची झाली फजिती, क्रिकेटप्रेमींकडून होतेयं टीका
- कळमना पूल दुर्घटनेची होणार चौकशी; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निर्णय


