Share

‘तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म! आहे ते फक्त हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेले मुख्यमंत्रिपद’

Published On: 

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील भाषणावेळी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपवर सडकून टीका केली होती. तसेच अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला होता. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे. राणेंनी ‘प्रहार’ या वृत्तपत्रातून मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत.

महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद हडपण्यासाठी तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली. आता तुमच्याकडे ना हिंदुत्व आहे, ना धर्म आहे. तुमच्याकडे आहे ते फक्त सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळविलेले मुख्यमंत्रिपद, असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे. आज प्रहारमध्ये ‘हार आणि प्रहार’मधील लेखातून नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा वृत्तांत ‘सामना’मध्ये वाचला. मेळाव्यामध्ये जोश आणि दरारा, जो संजय राऊत यांनाच दिसला, तो इतर कोणाला दिसला नाही. या दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तोंडी ‘नामर्द’, ‘अक्करमाशा’, ‘निर्लज्जपणा’ असे शब्द येतात आणि त्यांची उजळणी ‘सामना’मध्ये होते. याला काय म्हणायचे? ही भाषा आणि संस्कृती महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची नाही, अशी टीका नारायण राणेंनी केली आहे.

उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, मराठी माणसाची आणि हिंदूंची एकजूट करा, हिंदू तितुका मेळवावा, हिंदुस्थान धर्म वाढवावा.’ किती हा बोगसपणा? किती हा खोटारडेपणा? किती ही बनवाबनवी? महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद हडपण्यासाठी तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली. आता तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म! तुमच्याकडे आहे ते फक्त सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळविलेले मुख्यमंत्री पद!! याच ‘सामना’मध्ये उल्लेख आहे की, ‘अमली पदार्थांचा नायनाट केलाच पाहिजे. पण सत्तेचं व्यसन हा सुद्धा एक अमली प्रकारच आहे.’ कोण करणार नायनाट? सत्तेचा जनहितासाठी वापर कधी करणार? घ्या की अंगावर, करा की नायनाट ! संजय राऊत बरोबर बोलतात. सत्तेचं व्यसन हा सुद्धा अमली पदार्थांचाच प्रकार. सत्तेचे व्यसन लागल्यामुळेच हिंदुत्वाचा त्याग आणि सत्तेचा हव्यास केला गेला, असा टोलाही नारायण राणे यांनी यावेळी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!