Share

याला राज्य सरकारच दोषी; रावसाहेब दानवेंनी कोळसा टंचाईचं फोडलं खापर ठाकरे सरकारवर

Published On: 

औरंगाबाद : देशात सध्या कोळसा टंचाईचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये या विषयावरुन हमरी तुमरी सुरु आहे. कोळसा टंचाईचं केंद्र सरकार राज्यावर आणि राज्य सरकार केंद्रावर खापर फोडत आहेत. राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील कोळसा टंचाईला राज्य सरकार जबाबदार असल्याचं म्हंटल आहे. औरंगाबादमधील बुधवारच्या पत्रकार परिषदेत बोलताना दानवे यांनी कोळसा टंचाईसाठी राज्य सरकारच दोषी असल्याचे म्हणाले.

कोळशाचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असताना राज्य सरकारनेच वेळेत कोळशाचा साठा उचलला नाही, त्यामुळे राज्यभरात कोळशाची टंचाई निर्माण झाली, असा आरोप केंद्रीय रेल्वे व कोळसा, खाणी राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. गेल्या 15 दिवसांपासून कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्याअभावी वीजनिर्मिती घटली होती, त्यामुळे संपूर्ण राज्यावर भारनियमनाचे संकट घोंगावत होते.

गेल्या 15 दिवसांत राज्यातील वीजनिर्मिती प्रकल्पांना पूर्ण क्षमतेने कोळशाचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे राज्यात औष्णिक वीज प्रकल्पातील वीजनिर्मिती घटली होती. कोळसा टंचाईमुळे राज्य अंधारात जाण्याची परिस्थिती ओढवली होती. त्यामुळे राज्य शासनाने केंद्र शासनावर निशाणा साधून वेळेत कोळसा पुरवठा होत नसल्याचा आरोप केला होता. यावरुन बोलताना दानवेंनी, कोळसा टंचाईसाठी राज्य सरकारच दोषी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!