🕒 1 min read
मुंबई : ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची बहीण जास्मिन वानखेडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी आरोप केले होते. याच पार्श्वभूमीवर आता मनसेने पत्रकार परिषद घेत मलिक यांच्यावर टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात बोलतांना मनसे नेते अमेय खोपकर म्हणाले की,’जास्मिन वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांच्याकडून केले जाणारे आरोप आम्ही खपवून घेणार नाही.’ तसेच ‘जास्मिन ह्या मनसे चित्रपट सेनेच्या पदाधिकारी राहिल्या आहेत. त्या रात्रंदिवस महिला आणि मुलांसाठी काम करतात आणि त्यांना न्याय मिळवून देतात. आमच्या पदाधिकाऱ्यावर खालच्या पातळीची टीका केल्यास आम्ही खपवून घेणार नाही. नवाब मलिकांकडे त्यांच्या विरोधात काय पूरावे आहेत, हे त्यांनी दाखवून द्यावं,’ असे आव्हानही मनसेकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’नवाब मलिक हे कुठले डॉन आहेत का? सर्वजण नवाब भाई बोलतात. त्यांनी एखाद्या महिलेला लेडी डॉन बोलणे चुकीचं आहे. जास्मिन वानखेडेवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. चांगल्या कामाच्या मागे मनसे नेहमीच उभी राहील. महाराष्ट्रात जिथे चित्रपटांची शूटिंग चालतं तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जाऊन वसुली करतात, त्यांची लिस्ट देतो त्यांना अटक करून दाखवा.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी आठ तास अखंडीत वीज द्या, अन्यथा रास्तारोको आंदोलन करू’
- ‘मुंबई मनपाच्या पैशांचा शिवसेनेकडून पक्षनिधी म्हणून वापर’, बाळा नांदगावकर यांचे आयुक्तांना पत्र
- डोनाल्ड ट्रम्प स्वतःचं सोशल मीडिया नेटवर्क करणार लाँच
- ‘तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म! आहे ते फक्त हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेले मुख्यमंत्रिपद’
- भारताने सर्वांत कमी कालावधीत १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला-पंकजा मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
