Share

ऑस्ट्रेलियातील खेळाडू मायदेशी परतल्यास भरावा लागणार दंड, तुरुंगवास होण्याची देखील शक्यता

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतातील वाढत्या कोरोना संकटात इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) सेफ बायो बबलमधील खेळाडूंसाठीही चिंता केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि राजस्थान रॉयल्सचा (आरआर) वेगवान गोलंदाज एंड्रयू टायने भारतात वाढत्या कोरोनामुळे मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे (आरसीबी) केन रिचर्डसन आणि अ‍ॅडम जंपा यांनीही वैयक्तिक कारणास्तव लीग सोडण्याचा निर्णय घेतला.

तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया-भारत विमान प्रवास करण्यावर निर्बंध आले आहेत. अशा परिस्थतीत हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि राजस्थान संघातील स्टिव स्मिथ देखील IPLमधून माघार घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे.

मात्र, आयपीएल मधून मायदेशी परतण्याची इच्छा असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंसमोर वेगळेच संकट उभे राहिले आहे. सद्य परिस्थितीत मायदेशी परतू पाहणाऱ्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना सरकार कमाल ६६ हजार डॉलर्स दंड ठोठावेल अथवा पाच वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागेल अशी बातमी सिडनी हेरॉल्डने दिली आहे. दरम्यान, आयपीएल स्पर्धेसाठी खेळाडू वैयक्तिक जबाबदारीनं भारतात गेले आहेत म्हणून त्यांनी परतण्याची व्यवस्थाही स्वत:हूनच करावी, असं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!