Share

आजोबांच्या मृत्यूनंतरही राजस्थानच्या सलामीवीर खेळाडूने घेतला ‘हा’ निर्णय!

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही दिवसापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. या संसर्गाच्या सावटाखाली भारतात आयपीएल स्पर्धा सुरु आहे. कोरोनाच्या या लाटीत अनेक मान्यवराना संसर्गाची लागण झाली. देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन आणि अपुऱ्या औषधापोटी रुग्णांना जीव गमवावा लागत आहे.

या दरम्यान आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचा सलामीवीर मनन वोहराच्या आजोबाचे कोरोना संसर्गामुळे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. मनन वोहराचे आजोबा यश पाल वोहरा यांचे ३० एप्रिल रोजी निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते. माजी हॉकीपटू आणि क्रीडा प्रशासक असलेले यश पाल वोहरा यांना काही दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाली होती. मनन वोहराचे आई-वडीलानांही कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर आई-वडील कोरोनातून पूर्णपणे बरे झाले. मात्र कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्याचे आजोबा मात्र पराभूत झाले.

आजोबाच्या निधनाची वार्ता समजताच मनन दु:खी झाला होता. आजोबाच्या अंतिम संस्कारासाठी त्याला दिल्ली येथील घरी जायचे होते. त्याने यासाठी स्पर्धा अर्ध्यावर सोडण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र त्याचे वडिल संजीव वोहरा यांनी मननला त्याच्या आजोबाची शेवटची इच्छा सांगितली की,’त्यांच्या मृत्यूनंतर घरी न येता संघासोबतच थांबावे’. या इच्छेखातर मनन वोहराने घरी न जाता संघासोबत थांबण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेत आतापर्यंत मनन वोहराने ४ सामन्यात ४२ धावा केल्या आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!