Share

राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे ६,४४१ मेट्रिक टन डाळीचे नुकसान

Published On: 

मुंबई : केंद्र सरकारच्या वतीने धान्य वितरणासाठी राज्याला धान्य उपलब्ध करुन दिले जाते. मात्र, राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे ६ हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त डाळ वितरीत न करता खराब हाेत असल्याचा आरोप केंदीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. यासाठी राज्य सरकार जबाबदार असून या नुकसानीची जबाबदारी देखील राज्य सरकारची असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या संदर्भात रावसाहेब दानवे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य सरकारवर आराेप केले आहेत. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘महाराष्ट्र राज्याला १,११,३३७ मेट्रिक टन डाळ दिली. अशी एकुन १,१३,०४१ मेट्रिक टन डाळ महाराष्ट्राला दिली होती, परंतु राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे एकुन ६,४४१ मेट्रिक टन इतकी दाळ शिल्लक राहिली
ही बाब राज्य सरकारने ६ एप्रिल २०२१ रोज़ी भारत सरकारला संगितली. त्यावर भारत सरकारने त्वरित कारवाई करत १५ एप्रिल २०२१ रोजी राज्य सरकारला ही डाळ त्वरित लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी सांगितले. परंतु, महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकार ने डाळीच्या वितरणाची परवानगी दिली असताना इतकी डाळ शिल्लक राहणं हे महाविकास आघाडी सरकारचा निष्काळजीपणा दर्शावते. वितरण न केल्या मुळे आज राज्यात ठिकठिकाणी हि डाळ खराब होण्याची माहिती समोर येत आहे, व या नुकसानीस महा विकास आघाडी सरकार जबाबदार आहे.’

राज्य सरकारवर डाळ वितरीत न करण्याचा आरोप या आधी देखील करण्यात आला होता. केंद्र सरकारच्या वतीने मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे. त्यातही डाळीचा समावेश आहे. आधीच लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. गरिबांना अन्न मिळवण्यासाठी धडपड करावी लागते आहे. असे असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात डाळ शिल्लक राहिली असेल, तर प्रशासनाने यातील चूक सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!