Share

योगी आदित्यनाथांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; मंत्र्यांच्या नावावर होणार शिक्कामोर्तब

Published On: 

लखनऊ: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशात पाच वर्षे सरकार चालवल्यानंतर आता ते राज्यात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाच्या राज्याभिषेकाची तयारी करत आहेत. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी ते आज दिल्लीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दिल्लीतील मुक्काम दोन दिवसांचा असल्याची माहिती मिळाली आहे. 

योगी आदित्यनाथ आज रविवारी सकाळी दिल्लीत पोहोचले. नवी दिल्लीत आल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेतली. बी. एल. संतोष हे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान खूप सक्रिय होते आणि त्यांनी सतत मतदारसंघात भेटी देऊन संघटना मजबूत करण्याचे काम केले. योगी आदित्यनाथ आणि बी. एल. संतोष यांच्या भेटी दरम्यान केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनवाल हे देखील उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांबरोबर होणाऱ्या बैठकीत योगी आदित्यनाथ हे राज्यातील नवीन सरकारच्या शपथविधीची तारीख ठरवणार आहेत. तसेच मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात येणाऱ्या नव्या मंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावांची चर्चा देखील करण्यात येणार आहे.

सर्वोच्च नेत्यांशी भेटीगाठी 

दिल्लीत दाखल झाल्यानंतर योगींनी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. त्यानंतर पाच वाजता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते. संध्याकाळी 6 वाजता भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतल्यानंतर ते 8 वाजता संरक्षण मंत्री आणि लखनऊचे खासदार राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत. भाजपचे सर्वोच्च नेतृत्व आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांच्या शपथविधीची तारीख निश्चित केली जाणार आहे. त्याचबरोबर राज्यातील दोन उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या नावावरही शिक्कामोर्तब होणार आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!