🕒 1 min read
मुंबई : आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पोलिस बदल्यांचा घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांकडून जवाब नोंदवण्यात आला. पोलिसांनी जवाब नोंदवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. म्हणाले, ‘मी खुलेपणाने बोललो की मी चौकशीला जायला तयार आहे. संजय राऊत रोज घाबरून पत्रकार परिषद घेतात. रोज केंद्रीय तपास यंत्रणांवर आरोप करतात. मी तर सांगितलं की मी यायला तयार आहे. कुठे बोलवायचं तिथे बोलवा. त्यांच्यात हिंमत आहे का? ते रोज पत्रकार परिषदेत म्हणतात मला का बोलावलं? मला का बोलावलं? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहजे’, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टोला लगावला.
फडणविसांच्या टीकेला उत्तर देत संजय राऊत म्हणाले, ‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ऐकण्यात व पहाण्यात काही तरी दोष निर्माण झालाय. संजय राऊत मर्द शिवसैनिक आहे. घाबरण्याचा प्रश्नच नाही. केंद्रीय तपास यंत्रणा किती खोटे पणाने कारवाया करतात याचा पोलखोल करण्यासाठी मी दोन पत्रकार परिषद घेतल्या पुराव्यासह. इतकेही खोटे बोलू नका’ असा आक्रमक टोला संजय राऊत यांनी देखील लगावला.
महत्वाच्या बातम्या –


