मुंबई : आज सर्वत्र योग दिन साजरा केला जात आहे. दरवर्षी 21 जून रोजी हा साजरा केला जातो. हा दिवस वर्षाचा सर्वात मोठा दिवस आहे आणि योग देखील एखाद्या व्यक्तीला दीर्घ आयुष्य देखील प्रदान करतो. योगामुळे आपले शरीर निरोगी राहते. 21 सप्टेंबर 2015 रोजी प्रथमच हा दिवस साजरा करण्यात आला होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 27 सप्टेंबर 2014 रोजी पुढाकार घेतला होता. त्यानंतर 21 जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित करण्यात आला.
https://www.instagram.com/p/CQX3Kd0Bcgk/?utm_source=ig_web_copy_link
दरवर्षी योग दिन वेगवेगळ्या थीमच्या आधारे साजरा केला जातो. यावर्षी 2021 च्या योग दिनाची थीम ‘बी विथ योगा, बी अॅट होम’ म्हणजेच ‘योगासह रहा, घरी रहा’ अशी आहे. कोरोना काळामुळे योग घरे राहून करा असे आवाहन केले आहे. नियमित योगा केल्याने आयुष्यात सकारात्मकता व उर्जा टिकून राहते. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश योगाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना तणावमुक्त करणे देखील आहे.
https://www.instagram.com/p/CQXntJ_rFHq/?utm_source=ig_web_copy_link
योग दिवस मराठी कलाकारांनी देखील साजरा केला आहे. कलाकारांनी योगा करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कलाकार यावेळी आपल्या चाहत्यांना योगा करण्याचा सल्ला देखील देताना दिसत आहेत. मराठी कलाकारांचे योगा दिनाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
https://www.instagram.com/p/CQXpoZILiJ-/?utm_source=ig_web_copy_link
महत्वाच्या बातम्या
- दोन्ही काँग्रेसने शिवसेनेला मोठ्या मनाने सांभाळून घेतलंय, हे लक्षात ठेवावे-हसन मुश्रीफ
- ‘तुमचा ५१ वर्षीय युवा नेता निवडणुकीत सतत मार खाऊन दाढीची खुंट वाढवत फिरतोय’
- ‘तू फिरकी गोलंदाजी समजण्याचा प्रयत्न कर, आणि ‘हे’ ट्विट फ्रेम करून लाव’ ; वॉर्नच्या ट्विटवर सेहवागची प्रतिक्रिया
- खासदार संभाजीराजेंच्या नेतृत्वात नाशिकमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाला सुरवात
- मुलासाठी घेतल्याच्या ३ कोटीच्या कारबाबत सोनू सुदने केला खुलासा
- मागील विधानसभा निवडणुकीत फडणवीसांनी केलेली ‘ती’ चूक आता ते पुन्हा करणार नाहीत ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

