🕒 1 min read
मुंबई : सोनू सूदने नुकतच‘फादर्स डे’च्या निमित्ताने त्याच्या मुलाला एक गाडी भेट दिली आहे. सोनूने काळ्या रंगाची मिर्सिडीज मेबाच जीएलएस ६०० इशांतला भेट म्हणून दिली आहे. या गाडीची किंमत ३ कोटी रुपयांच्या जवळपास असल्याचे म्हटले जात होते. ही गाडी गेल्या आठवड्यातच भारतात लॉन्च करण्यात आली आहे. सोनू सूदचा एक व्हिडीओ सध्या युट्यूबवर खूप व्हायरल होत असताना सोनुने यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्याने मुलासाठी कोणतीही कार घेतली नसल्याचे सांगितल आहे.
सोनू सूदने यावेळी सांगितल की, ‘आम्ही कोणतीच कार खरेदी केली नाही. या सुरु असेलल्या चर्चा सत्य नाही. मी माझ्या मुलासाठी कोणतीच कार घेतलेली नाही. व्हिडीओमध्ये दिसत असलेली कार आमच्या घरी ट्रायलसाठी आली होती. आम्ही टेस्ट ड्राईव्ह साठी गेलो होतो. यात फादर्स डे चा अॅंगल कुठून आला ते माहित नाही मला. फादर्स डे च्या दिवशी मी माझ्या मुलाला गिफ्ट का देणार ? उलट त्यांनी मला काही तरी गिफ्ट केलं पाहिजे,’ असे सोनू म्हणाला.
सोनूने महागडी कार मुलाला गिफ्ट केल्याच्या माहितीवर त्याचे चाहते त्याच्या बाजूने होते. त्यामुळे त्याने त्याच्या चाहत्यांचे आभार मानत म्हणाला की, गेल्या एक महिन्यापासून जी मला सकारात्मकता आणि प्रेम मिळतंय, त्यासाठी सर्वांचा मी आभारी आहे. हेच जीवनातलं सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे. मग किती तरी जणांनी माझ्या कामाप्रती लोकांच्या मनातील विचारांना बदलण्याचा प्रयत्न केला तरी माझे शुभचिंतक कधीच माझ्यावर शंका घेणार नाही.’
कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लॉकडाऊन दरम्यान अनेक हातावर पोट असणाऱ्या लोकांवर मोठ संकट ओढावले होत. अशा प्रतिकूल परिस्थितीत अभिनेता सोनू सूदने पुढे येत शेकडो मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवलं, अनेकांना रोजगार मिळवून दिला. गरीब विद्यार्थांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. त्याच्या या दानशुरपणाची सर्वत्र स्तुती होत आहे. अनेक लोक त्याला देवा समान मानतात.
महत्वाच्या बातम्या
- 8 दशकाचा जुना विक्रम मोडताच जेमिनसनवर नाराज आरसीबीचे चाहते ; केली ‘ही’ मागणी
- पोलिसांच्या वाहनाला अपघात! आरोपी चे मेडिकलकरून पोलीस ठाण्यात जात असलेल्या टू मोबाईल वाहनाला दुचाकीची धडक
- मराठा आंदोलनाची दिशा उद्या नाशकातून ठरणार
- मराठा आरक्षण; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात विनोद पाटलांची पुनर्विचार याचिका
- ‘काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी ‘महाविकास आघाडी’ स्थापन केली काय?’, सरनाईकांचा उद्धव ठाकरेंना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
