🕒 1 min read
पुणे – शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. सरनाईक यांच्या पत्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनाकारण त्रास दिला जात असल्याचे नमूद आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा युती केली तर शिवसेनेला फायदा होईल, असे प्रताप सरनाईक यांनी या पत्रात नमूद केले आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते फोडत आहेत, असा बॉम्ब सरनाईक यांनी या पत्रातून टाकला आहे.
दरम्यान, प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे राज्यात पुन्हा शिवसेना भाजप युती होणार का हा प्रश्न केंद्रस्थानी ठेवून चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजपच्या काही नेत्यांनी या पत्राचे स्वागत केले तर काहींनी यावर सावध भूमिका घेतली आहे. मात्र सर्वात लक्ष्यवेधी भूमिका विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.
प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेना-भाजप युती करण्यासंदर्भात लिहिलेल्या पत्रावर फडणवीस यांनी भाष्य केले आहे. शिवसेना-भाजप युती व्हावी अशी अनेकांची इच्छा असू शकते. मात्र आमचं स्पष्ट मत आहे की, शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या पक्षप्रमुखांनी त्यांना काय उत्तर द्यावं हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत. जनतेचे प्रश्न आम्ही मांडत आहोत. सिंगल लार्जेस्ट पार्टी होतो, पण बहुमत नव्हतं. येत्या काळात आम्ही बहुमताने निवडून येऊ, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
भाजप स्वबळावरच लढत आहे. कुणी कोणाला जोडे मारायचे कुणी कुणाला हार घालायचे हे त्यांनी ठरवायचे आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावला. आता कुणासोबत कुणी जायचं त्यांनी ठरवायचं आहे. आमची बांधिलकी जनतेशी आहे. जनतेच्या बांधीलकीतून आम्ही काम करत राहू, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
फडणवीस यांनी घेतलेली ही भूमिका देखील अनेकांच्या भुवया उंचावणारी आहे. मात्र फडणवीस यांनी आता घेतलेली ही भूमिका त्यांची मागील काळात झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी टाकलेले एक पाऊल आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांसह जेष्ठ नेत्यांची अशी इच्छा होती की भाजपने स्वबळावर निवडणूक लढवावी परंतु त्यावेळी फडणवीस यांनी युती करून निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली होती. याचाच पुढे फटका भाजपला बसला. अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार शिवसेनेमुळे पराभूत तर झालेच मात्र पुढे शिवसेनेनेच महाविकास आघाडी स्थापन करत फडणवीस यांना जोरदार धक्का दिला.
दरम्यान,आगामी काळात भाजप स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे फडणवीस यांच्या या प्रतिक्रियेवरून दिसून येत आहे. यामुळेच आता पुन्हा अशी युतीची चर्चा सुरु होताच फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला असून पुढील मनसुबे देखील स्पष्ट केले आहेत .
महत्वाच्या बातम्या
- डब्ल्युटीसी फायनल! तिसऱ्या दिवशी न्युझीलंड २ बाद १०१
- ‘जडेजा-अश्विनची जोडी टीम इंडियासाठी ठरणार गेम चेंजर’ ; दिग्गज खेळाडूचा दावा
- ….त्या दिवशी क्रिकेट सोडून देईन, निवृत्तीवर अश्विनचे मोठे विधान
- दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३०९ धावांचे लक्ष्य
- …अन् विराट कोहली मैदानात करू लागला भांगडा , पाहा भन्नाट व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
