Share

‘तू फिरकी गोलंदाजी समजण्याचा प्रयत्न कर, आणि ‘हे’ ट्विट फ्रेम करून लाव’ ; वॉर्नच्या ट्विटवर सेहवागची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

इंग्लंड : डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्याला शनिवार पासून सुरुवात झाली आहे. या सामन्यासाठी कर्णधार विराट कोहलीने सहा बॅट्समन आणि पाच बोलर्सच्या साथीने उतरण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने अनुभवी गोलंदाजांसोबत टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याचं ठरवलं.

तर दुसरीकडे म्हणजेच न्यूझीलंड संघाने टीममध्ये एकाही स्पिनरला संधी दिलेली नाही. न्यूझीलंडकडे काईल जेमिसन, निल वॅगनर, टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्ट आणि कॉलिन डे ग्रॅण्डहोम या पाच फास्ट बॉलर्सचा टीममध्ये समावेश केला आहे. यावरूनच ऑस्ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर शेन वॉर्नने एक स्पिनरची निवड न केल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती.

वॉर्ननं ट्विट करत लिहिले होते की, ” न्यूझीलंडनं आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एकही स्पिनर खेळवलेला नाही. त्यामुळे मी खूप निराश आहे. हे पिच स्पिनर्सना मोठी मदत करणार आहे, असं दिसत आहे. तसं खरंच झालं आणि भारताने 275-300 पेक्षा जास्त रन काढले तर मॅच संपलीच म्हणून समजा. त्यानंतर फक्त हवामानच तुम्हाला वाचवू शकेल.” असं भविष्य वॉर्ननं व्यक्त केलं आहे.

शेन वॉर्नच्या या ट्वीटवर चाहत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. इतकेच नव्हे, तसेच वॉर्न ट्वीटची खिल्ली देखील उडविली आहे. ‘फिरकी गोलंदाजी कशी कार्य करते हे तुम्हाला माहीत आहे का? खेळपट्टी कोरडी राहिल्यावर फिरकी काम करते. पण साऊथम्प्टनमध्ये पाऊस पडत आहे, त्यामुळे खेळपट्टी ओली आहे’, असे एका चाहत्याने वॉर्नला ट्वीट करत सांगितले.

या ट्वीटवर भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने वॉर्नची मजा घेतली. त्याने वॉर्न आणि या चाहत्याचे ट्वीट रिट्वीट करत म्हटले, ”वॉर्न, ही प्रतिक्रिया फ्रेम करून ठेव आणि फिरकी गोलंदाजी समजण्याचा प्रयत्न कर.’ अशी प्रतिक्रिया सेहवागने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!