नाशिक : नाशकात आज खासदार संभाजीराजे छत्रपतींचं आंदोलन होत आहे. छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ उपस्थित राहणार आहेत. आंदोलनात पुढील दिशा निश्चित होणार आहे. लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. आंदोलनानंतर राज्य समनवयकांची बैठक होणार आहे.
कोल्हापूरमध्ये सुरु झालेलं मूक आंदोलन सुरुच राहणार आहे. हे आंदोलन 36 जिल्ह्यांमध्ये घेऊन जाण्याचा आमचा निर्धार आहे. राज्य सरकारशी झालेल्या चर्चेत त्यांनी आंदोलन थांबवण्याबाबत विनंती केली. मात्र, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. सरकारशी चर्चा सुरु आहे. नाशिकला सर्व समन्वयकांशी चर्चा करुन पुढील दिशा ठरवली जाणार आहे, असं खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले होते.
नाशकात आज होणाऱ्या मराठा मूक आंदोलनासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 20 अधिकारी आणि 150 कर्मचारी आंदोलनस्थळी तैनात असून आंदोलनावर नजर ठेवणार आहेत.
ज्या ठिकाणी आंदोलन पार पडणार आहे तिथे प्रवेशद्वारावरच बैरिकेटींग करण्यात आले असून येणाऱ्या आन्दोलकांची तपासणी केली जात आहे. आंदोलन मूक असल्यानं कोणीही घोषणाबाजी करू नये आशा स्पष्ट सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. आंदोलना नंतर समन्वयक बैठक घेतली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- डब्ल्युटीसी फायनल! तिसऱ्या दिवशी न्युझीलंड २ बाद १०१
- ‘जडेजा-अश्विनची जोडी टीम इंडियासाठी ठरणार गेम चेंजर’ ; दिग्गज खेळाडूचा दावा
- ….त्या दिवशी क्रिकेट सोडून देईन, निवृत्तीवर अश्विनचे मोठे विधान
- दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३०९ धावांचे लक्ष्य
- …अन् विराट कोहली मैदानात करू लागला भांगडा , पाहा भन्नाट व्हिडीओ


