Share

‘तुमचा ५१ वर्षीय युवा नेता निवडणुकीत सतत मार खाऊन दाढीची खुंट वाढवत फिरतोय’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा नाना पटोले यांनी स्वीकारल्यापासून ते अधिक आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडीमध्ये असलेल्या काँग्रेसने आत्तापासूनच राज्यभरात होणाऱ्या विविध निवडणुकांसह पुढील विधानसभा निवडणुकांसाठी देखील स्वबळाची तयारी सुरु केली आहे. स्वबळाचा नारा देणाऱ्या नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

‘मागील ७० वर्षांत काँग्रेस पक्षाने मोठ्या कष्टाने देश आणि व्यवस्था उभी केली. मात्र या सरकारने सात वर्षांत एक एक कंपनी, संस्था विकत आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत दिल्लीतील दोन्ही दाढीवाल्यांचे शटर बंद करायचे आहे. एवढंच आपल लक्ष्य आहे,’ अशी गर्जना नाना पटोले यांनी पुण्यातील कार्यक्रमात काल केली होती.

दरम्यान नाना पटोलेंच्या या टीकेला भाजपाचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी उत्तर दिलं आहे. भातखळकर यांनी ट्वीट केलं असून, “सध्या तुमचा ५१ वर्षीय युवा नेता निवडणुकीत सतत मार खाऊन दाढीची खुंट वाढवत फिरतोय ते पाहा,” असा टोला लगावत काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस पाच वर्षे शिवसेनेसोबत राहणार
‘स्वबळाची भाषा जसे आम्ही करतो तसे भाजपवाले पण करतात. त्यामुळे मुख्यमंत्री कुणाला बोलले ते स्पष्ट नाही. स्वबळाचा नारा देणं चुकीचं नाही. काँग्रेस शिवसेनेसोबत पाच वर्ष राहणार आहे. सोनिया गांधी यांनी त्यांना तसा शब्द दिला आहे,’ अशी ग्वाही देतानाच उद्धव ठाकरे हे काल पक्षप्रमुख म्हणून बोलले असं देखील भाष्य नाना पटोले यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!