Share

‘कालच्या घटनेने राणेंची गुर्मी उतरवली’; वैभव नाईक यांची बोचरी टीका

Published On: 

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राज्यात वातावरण तापल्याच पाहायला मिळालं. शिवसेना-भाजप यांच्यात विविध ठिकाणी राडा झाला. तर राणेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. राज्यात केंद्रीय मंत्र्यांना पोलिसांनी अटक करण्याची ही पहिलीच घटना घडली.

शिवसेनेच्या नेत्यांनी राणेंवर हल्लाबोल केला असून आता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी देखील बोचरी टीका केली आहे. ‘नारायण राणे हे गेले कित्येक वर्ष आपल्या पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर लोकांना तत्त्वज्ञान पाजळत होते. कायद्यापासून पळत होते. मात्र हे सरकार कायद्याने चालणारे सरकार आहे. कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही हे या सरकारने राणेंना दाखवून दिलंय. त्यामुळे कालच्या प्रकरणात राणेंची गुर्मी उतरवली गेली,’ असा घणाघात वैभव नाईक यांनी केला आहे. राणे आणि नाईक कुटुंबात आधीपासूनच वाद असून आता या विधानामुळे तो अधिक वाढण्याची शक्यता आहेत.

काय म्हणाले होते नारायण राणे?

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात संबोधित करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यांनी हिरक महोत्सव म्हटलं. त्या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अमृत महोत्सव असल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मग मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. यावर जन आशीर्वाद यात्रेदरम्यान महाड येथे नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य केले . मला मुख्यमंत्र्यांची लाज वाटते. मुख्यमंत्र्यांना देशाला स्वातंत्र कुठल्या वर्षी मिळाले ते वर्ष सुद्धा माहिती नाही. स्वातंत्रदिनाच्या भाषणात हे दिसले. मी तेथे असतो तर एक कानशिलात लगावली असती, असे वादग्रस्त विधान राणे यांनी केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!