मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दौऱ्यातील पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात विराटने नाणेफेक गमावली होती. मात्र तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
हेडिंग्ले कसोटीत नाणेफेक जिंकत विराटने नाणेफेक गमावण्याची मालिका खंडीत केली. यापुर्वी विराटने इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात एकदाही नाणेफेक जिंकली नव्हती. या सामन्यात नाणेफेक जिंकत विराटने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यापुर्वी विराटने इंग्लंडमध्ये ८ कसोटी सामने खेळला आहे. २०१८ साली इंग्लंड दौऱ्यात कोहलीने ५ वेळा नाणेफेक गमावली होती. यानंतर सध्याच्या दौऱ्यातील नॉटिंगहॅम आणि लॉर्ड्स दोन्ही कसोटीत कोहलीने नाणेफेक गमावली होती. तसेच साऊथम्प्टनमध्ये झालेल्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात नाणेफेकही हरला होता.
हेडिंग्ले कसोटीत भारतीय संघात काहीही बदल करण्यात आली नाही. तर इंग्लंडच्या संघात मार्क वुडच्या जागी क्रेग ओव्हरटनला संघात स्थान देण्यात आले आहे. तर डॉमीनीक सिब्लेच्या जागी डेव्हिड मलनचे संघात पुनरागमन झाले आहे. मार्क वुडच्या जागी साकीब महमुदला संघात स्थान मिळणार अशी चर्चा सुरु आहे. मात्र असे घडले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- हेंडिग्ले कसोटीत नाणेफेक जिंकत विराटचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये इंजिनिअर पदासाठी भरती
- ‘सोमय्या यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा’ ; राष्ट्रवादीचा हल्लाबोल
- ‘त्या’ १०० कोटी रुपयांच्या मालमत्तेशी माझा दमडीचाही संबंध नाही, भुजबळांचा दावा
- ‘जीभ ताब्यात ठेवा… शिवसैनिक ठाम आहे’; ठाण्यातील ‘त्या’ पोस्टरची चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
