Share

‘सख्खा भाऊ योगी, शहांबद्दल असं बोलत नाही’; राणेंकडून मुख्यमंत्र्यांच्या चुकीच्या वक्तव्याचे दाखले

Published On: 

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अटकेनंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांना सख्ख्या भावाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका मुलाखतीत शिवसेनेला ‘सख्खा भाऊ’ असं म्हंटलं होत. यावर नारायण राणेंना विचारलं असता, ‘आधी सख्खा भाऊ असावा की नाही, यावरच शंका आहे. मग सख्खा, चुलत वगैरे नंतर.., असं राणे म्हणाले आहेत.

सख्खा भाऊ थोबाड फोडण्याची भाषा करत नाही. चंद्रकांत पाटलांच्या मनात वेगळं काहीतरी असेल. सख्खा भाऊ असं आमच्या योगी आदित्यनाथ, अमित शहांबद्दल असं बोलत नाही, असं सांगत मुख्यमंत्र्यांच्या चुकीच्या वक्तव्याचे दाखले दिले आहेत. दरम्यान, ‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आमचे मार्गदर्शक आहेत, आम्हाला ते मार्गदर्शन करतात. ते जे सांगतील ते मी स्वीकारेल’, असं राणेंनी यावेळी सांगितले आहे.

कितीही माऱ्यामाऱ्या झाल्या तरी सख्खा भाऊ हा सख्खाच असतो तो कधी सावत्र होत नाही. कितीही विरोध झाला कितीही भांडणं झाली तरीही दोघांचं रक्त एकच एकच आहे. ते म्हणजे हिंदूत्वाचं. ‘आमच्यात भांडणं लावण्याचं काम हे राष्ट्रवादी आणि काँग्रसने केलं आहे आणि आता ते मजा पाहत आहेत’, असा गंभीर आरोप यावेळी चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रावादीवर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!