Share

राणेंना कोर्टाचा दिलासा ; कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे हायकोर्टाकडून आदेश

Published On: 

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह विधान चांगलेच भोवले आहे. त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करत रात्री २४ ऑगस्टरोजी त्यांना संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. दरम्यान महाड प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी रात्री त्यांचा जामीन मंजूर केला. काल दिवसभर या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले.

दरम्यान आता नारायण राणेंना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. सुनावणी दरम्यान १७ सप्टेंबरपर्यंत राणेंवर कोणतीही कठोर कारवाई न करण्याची आदेश हायकोर्टाने दिले असून राज्य सरकारने देखील त्याबाबत हमी दिली आहे. तसेच राणेंवर जिथे गुन्हे दाखल आहेत तिथे जाण्याची गरज नाही.

नारायण राणेंविरुद्ध राज्यात विविध ठिकाणी दाखल केलेल्या गुन्हे हे खोटे आहेत, असे राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितले आहे. तसेच नारायण राणेंचे वकील सतीश माने शिंदे यांनी ही मागणी म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे, त्यानंतर हायकोर्टाने राज्य सरकारची ही मागणी मान्य केली नाही. तसेच पुढील सुनावणी १७ सप्टेंबरला घेण्यात येईल असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!