मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाड कोर्टाने जामीन दिल्यानंतरआज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सभ्य भाषेत टीका केली आहे. दरम्यान यावेळी त्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत त्यांना संतप्त सवाल केला आहे.
यावेळी त्यांनी महाविकासआघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ज्यांना देशाबद्दल अभिमान नसतो. त्यांना राष्ट्रीय सण माहिती नसतात. देशाबद्दल अभिमान आहे म्हणून सहन झालं नाही. म्हणून जे आज बोललो ते रेकॉर्डवर आहे. असं स्पष्टीकरण देत त्यांनी सेना भवनबद्दल अशी कोण भाषा करेल त्याचं थोबडं तोडा असे आदेश दिले. हा क्राईम नाही का? हा कलम १२० अंतर्गत गुन्हा होत नाही का असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानाबाबत उपस्थित केला. ‘हा योगी आहे की, ढोंगी’, चप्पलांनी मारले पाहीजे. सुसंस्कृतपणा पवार साहेब, सुसंस्कृतपणा कुठंय असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री केलंत त्याचा सुसंस्कृतपणा बघा. अशी टीका केली आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचाही नारायण राणे यांनी समाचार घेतला.
दरम्यान राणे यांना १७ सप्टेंबरपर्यंत दिलासा मिळाला आहे. पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही अशी ग्वाही सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. तसेच दोन्ही निकाल माझ्या बाजून लागले आहेत. देशात अजूनही कायद्याचं राज्य आहे हे दिसून येतं. काही जण माझ्या मैत्रीचा आणि चांगुलपणाचा फायदा उचलतात हेही माझ्या लक्षात आलं आहे. जन आशीर्वाद यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. गेल्या सात वर्षात त्यांनी केलेली काम तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम सुरु आहे. दुसरं देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मला कॅबिनेट मंत्रिपद दिलं. तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी सर्व मंत्र्यांना सांगितलं की, तुम्ही तुमच्या राज्यात जा आणि जनतेचा आशीर्वाद घ्या. तुमच्या कामकाजाला सुरुवात करा. १९ ऑगस्टपासून मी माझ्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. आता दोन दिवस विश्रांती घेत परवापासून सिंधुदुर्गातून यात्रेला सुरुवात होईल. त्यामध्ये व्यत्यय पडणार नाही. असेही त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘माझ्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार’, नारायण राणेंचे ट्वीट
- नाणेफेक जिंकत विराटने संपवला ‘तो’ इंग्लंडमधील दुष्काळ
- ‘सैराट’ फेम आर्चीच्या हटके लुकने वेधले चाहत्यांचे लक्ष
- हेंडिग्ले कसोटीत नाणेफेक जिंकत विराटचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
- ‘भोक तुमच्या फुग्याला पडलंय राऊतसाहेब…’ ; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

