मुंबई : राज्य सरकारने दहीहंडी उत्सव साजरा करण्यास मनाई केलेली आहे. यामुळे भाजप, मनसेने याला विरोध केला असून ठाणे, मुंबईत दहीहंडी उत्सव साजरा करणार असल्याचे मनसेने सांगितले होते. पोलिस बंदोबस्त असूनही सारे निर्बंध झुगारून मनसेने ठिकठिकाणी रात्री, पहाटेच्या सुमारास दहीहंडी उभारून, मानवी मनोरे उभारत दहीहंड्या फोडल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कृत्याचा समाचार घेत मनसेवर अप्रत्यक्षरिता निशाणा साधला. ‘काही जणांनी दहीहंडी केली. हे काय स्वातंत्र्य युद्ध नाही. कोरोनाचे नियम तोडून आम्ही करुन दाखवलं हे काय मोठं स्वातंत्र्य नाही मिळवलं. त्याच्यासाठी आंदोलन केलं असतं तर भाग वेगळा. नियमांना विरोध करायला हा सरकारी कार्यक्रम नाही आहे. फुकट कोरोना वाटप केलं जातंय,’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला होता.
आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना चोच उत्तर दिलं आहे. ‘एकेकाळी रँड नावाचा अधिकारीह असा वागायचा. त्यावेळी चाफेकर बंधुंनी आवाज उठवला तशीच वेळ आता आली आहे. मुख्यमंत्री म्हणतात हे स्वातंत्र्ययुद्ध आहे का? तर हो… हे स्वातंत्र्ययुद्धच आहे,’ असं भाष्य देशपांडे यांनी केलं. यासोबतच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जसे आदेश देतील तसं मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करू असं देखील देशपांडे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, पुढे बोलताना संदीप देशपांडे यांनी युवासेनेच्या वरुण सरदेसाई यांनी केलेल्या आंदोलनावरून मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला. ‘मुख्यमंत्री दुसऱ्यांना सांगतात. मग स्वत:च्याच पक्षातील लोकांना घरी बसायला का सांगत नाहीत? आंदोलन करत असताना शिवसैनिकांना घरी बसायला का सांगितलं नाही? वरुण सरदेसाईवर गुन्हा दाखल झाला का? तो भाचा आहे म्हणून एवढी सूट देताय का?’ असे सवाल देखील देशपांडे यांनी उपस्थित केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरलीये, मंत्र्यांची अजून मोठी यादी तयार’; चंद्रकांतदादांच्या विधानाने खळबळ
- ‘सर्वसामान्य लोकांनी काय पाप केलंय? शिवसेना खासदार मागच्या दाराने सिद्धिविनायकाच्या दर्शनाला’
- ‘रिमोट ही आमची वडिलोपार्जित देणगी, हातातला रिमोट आम्ही सोडत नाही’
- ‘राज्यातील नेत्यांना हात जोडून विनंती करतो ओबीसींच्या हक्काचे हिरावू नका’
- शिवसेनेची ‘कावड यात्रा’ ; आ. दानवेंसह शिवसैनिकांवर गुन्हे दाखल!


