Share

शिवसेनेची ‘कावड यात्रा’ ; आ. दानवेंसह शिवसैनिकांवर गुन्हे दाखल!

Published On: 

औरंगाबाद : शिवसेनेचे प्रवक्ते आमदार अंबादास दानवे यांनी रविवारी ‘हर हर महादेव कावड यात्रा’ काढली. यावेळी खडकेश्वर येथील महादेव मंदिरात मागील दरवाजाने प्रवेश करत प्रतिकात्मक पद्धतीने कावड यात्रा काढली. मात्र शासन आदेश नसतांना कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आ. अंबादास दानवे यांच्यासह दहा जणांवर सिटी चौक आणि बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी शिवसेनेच्या वतीने प्रतिकात्मक कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा करण्यात आली होती. यावेळी जगावर आणि भारतावर असलेले कोरोनाचे संकट संपायला हवे, आणि पुढच्या वर्षी ५० नाही तर ५० हजार भक्तांच्या उपस्थितीत ही यात्रा काढण्याची संधी द्यावी, असे साकडे दानवे यांनी यावेळी महादेवाला घातले. मात्र सोशल डिस्टंसिंगच्या नियमांना यावेळी पूर्णपणे हरताळ फासण्यात आला.

आमदार अंबादास दानवे यांच्यासह दहा जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी मंदिरे बंद असताना सत्ताधाऱ्यांसाठी मंदिराचे दरवाजे कशी खुली होतात? असा सवाल विरोधकांनी यावेळी उपस्थित केला होता. कावड यात्रेमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आमदार दानवे, राजेंद्र दानवे, विश्वनाथ राजपूत, सोमनाथ बोंबले, किशोर नागरे, गोपाल कुलकर्णी, विजय वाघचौरे, संजय हरणे, संतोष जेजुरकर यांच्यासह इतरांवर सिटीचौक, बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!