नागपूर : राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने मनी लॉन्डरिंगप्रकरणी चौकशीचा समन्स बजावला होता. त्यासाठी आज ईडी कार्यालयात त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना केली होती. मात्र, अनिल परब आज ईडीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत. ईडीने नोटीस पाठवून हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अनिल परब चौकशीला गेलेच नाही. त्यांनी याबाबतचं कारण ईडी कार्यालयाला पत्राद्वारे कळवलं आहे. त्याचबरोबर हजर राहण्यासाठी १४ दिवसांचा अवधी मागितला आहे. अनिल परब यांनी वकिलांच्या माध्यमातून ईडीला पत्र पाठवलं आहे.
अनिल परब यांच्या गैरहजेरीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. ‘अनिल परब यांनी ईडी चौकशीसाठी हजर राहायला हवं होतं. आता शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली आहे’, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
‘सर्वसामान्य माणसांना लगेच अटक होते. मग अनिल परब यांनी कितीही व्यस्त असलं तरी ईडी चौकशीला हजर राहायला हवं होतं. अनिल देशमुखांचंही असंच चाललं आहे. शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली आहे. रांगेनं एक-एक मंत्री आहे. आधी राठोड गेले, मग देशमुख आणि आता अनिल परब. मंत्र्यांची अजून मोठी यादी आहे. काही जण सुपात आहेत, तर काही जण जात्यात,’ असं विधान करत चंद्रकांत पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- परळीत मुंडे बंधु-भगिनी एकाच व्यासपीठावर; एकमेकांना चिमटे काढत टोलेबाजी
- सचिन पिळगावकर यांनी जन्माष्टमीच्या शुभेच्छा उर्दूत दिल्याने सोशल मीडियावर ट्रोल
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘घंटानाद करा, नाहीतर काहीही करा, पण आमचा नाद करू नका’, किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंना टोला
- ‘हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचे आंदोलन नाही’, ठाकरेंचा मनसे, भाजपला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

