मुंबई : मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून चांगलेच राजकारण रंगले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करण्यात मश्गुल असल्याचे दिसून येत आहे. भटक्या विमुक्तांच्या मुक्ती दिनानिमित्त मंत्री मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत आज सोलापुरात मोठा मेळावा पार पडला. या वेळी त्यांनी उपस्थितांसमोर आपली भूमिका मांडली.
ज्यांना आरक्षण हवे आहे, त्यांनी स्वतंत्रपणे त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करावेत. मात्र, आमच्या हक्काचे जे आहे, त्यातून काही मागू नका, अशी भूमिका मदत विजय वडेट्टीवार यांनी सोलापुरात स्पष्ट केली. राज्यातील मोठ्या नेत्यांना हात जोडून विनंती करतो की, आमच्या हक्काचे आहे, तसेच राहू द्या. हक्कासाठी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर येण्याची आमची तयारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ओबीसी, व्हीजेएनटी समाजाची ताकद मोठी असतानाही आज हा समाज दुसऱ्याकडेच मागतो आहे. परंतु, समाजाने ताकद दाखवताना संघटित झाल्यास, निश्चितपणे देण्याची ताकद निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला. ओबीसी समाजाचे रद्द झालेले राजकीय आरक्षण मिळवून देणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी स्वतंत्र अधिवेशनाची मुख्यमंत्र्यांकडे विनंती करू, त्या अधिवेशनात बिल मांडू आणि त्या वेळी जो विरोध करेल, तो कायमचा मरेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावर अजूनही..’, मनसेनी साधला सेनेवर निशाना
- संतापजनक : महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याचा जीवघेणा हल्ला; दोन बोटं तुटली
- ‘बंद है मंदिर, बंद पाठशाला, खुली है लेकीन ‘मधुशाला’; भाजप महिला मोर्चाचा हल्लाबोल
- धार्मिक स्थळं बंद करण्यामागे सरकारचा हेतू काय?, राणाजगजितसिंह पाटील यांचा सवाल
- सरकारच्या नाकावर टिच्चून मनसेने मध्यरात्री दहीहंडी फोडली; पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

