Share

‘रिमोट ही आमची वडिलोपार्जित देणगी, हातातला रिमोट आम्ही सोडत नाही’

Published On: 

मुंबई : आज शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी उभारलेल्या ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत, मंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र फाटक यांच्यासह शिवसेनेचे दिग्गज नेते उपस्थित होते.

दरम्यान, आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाकरे यांना, ‘आपण ठाण्यातील ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण करावे,’ अशी विनंती करत ‘साहेब, रिमोट आहे ना समोर,’ अशी विचारणा मुख्यमंत्र्यांना केली. यावर, ‘मी हातातला रिमोट सोडत नाही. रिमोट ही आमची वडिलोपार्जित देणगी आहे,’ असं उत्तर देताना ठाकरेंनी स्मितहास्य केलं. तर उपस्थितांच्या गालावर हसू उमटत जुन्हा आठवणी समोर आल्या.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ‘आज प्रताप सरनाईक कोरोना विरोधात जे आंदोलन करताहेत, तसे करण्याची गरज आहे . पण दुर्देवाने तेवढी प्रगल्भता इतर काही लोकांमध्ये दिसत नाही. आपल्या बेशिस्त वागणूकीतून ते शिस्त पाळणाऱ्या लोकांचे जीवन ही अडचणीत आणत आहेत. चांगल्या कामासाठी नेहमीच निधी मिळाला आहे येथून पुढेही निधी मिळेल,’ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

‘अनेकजण तारीख पे तारीख जाहीर करतात, प्रत्यक्षात काही करत नाहीत पण पंधरा दिवसापूर्वी तारीख ठरवून जनतेचे प्राण वाचवण्यासाठी प्राणवायूचा प्रकल्प सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून आमदार प्रताप सरनाईक यांचे अभिनंदन.’ असे मत व्यक्त करून त्यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!