मुंबई : ज्यातील कोरोनाची दुसरी लाट ही ओसरली असून बहुतांश निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली. अशातच काही महत्त्वाचे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. बहुतेक सर्व सुरु झाले असताना सर्वधर्मीय प्रर्थनास्थळे अद्यापही बंदच असल्याने मोठ्याप्रमाणावर नाराजी वाढत आहे. भाजपची आध्यात्मिक आघाडी मंदिरे सुरु करण्याची मागणी सातत्याने करताना दिसून येत आहे. भाजपकडून काल राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्यात आले.
एकीकडे सामान्यांसाठी मंदिरे खुली करावे यासाठी आंदोलन सुरु असताना शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र आणि जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव हे मात्र नियम धुडकावून मंदिरात अभिषेक करत असल्याचे समोर आले होते. आता शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी देखील मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचे फुटेज समोर आले आहे. यामुळे देवाच्या दारात देखील आमदार-खासदारांना वेगळा न्याय आणि सामान्यांवर अन्याय होत असल्याचे समोर येत असून यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
https://twitter.com/BhatkhalkarA/status/1432670967264735233?s=20
‘शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी सिद्धिविनायकाचे मागील दाराने दर्शन घेतले. मग सर्वसामान्य लोकांनी काय पाप केलंय? देवावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करू नका आणि मंदिरे कडीकुलुपात ठेवून जनतेचाही अंत पाहू नका,’ असा इशारा अतुल भातखळकर यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरलीये, मंत्र्यांची अजून मोठी यादी तयार’; चंद्रकांतदादांच्या विधानाने खळबळ
- सचिन पिळगावकर यांनी जन्माष्टमीच्या शुभेच्छा उर्दूत दिल्याने सोशल मीडियावर ट्रोल
- ‘रिमोट ही आमची वडिलोपार्जित देणगी, हातातला रिमोट आम्ही सोडत नाही’
- ‘घंटानाद करा, नाहीतर काहीही करा, पण आमचा नाद करू नका’, किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंना टोला
- ‘हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचे आंदोलन नाही’, ठाकरेंचा मनसे, भाजपला टोला


