Share

‘होय, मी गुन्हा केलाय..’, सुप्रीम कोर्टातील कथित ऑक्सिजन रिपोर्टवर केजरीवालांचा खुलासा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या ऑक्सिजन ऑडिट कमिटीने मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा आणि वापर यामध्ये मोठा गोंधळ झाल्याचा दावा केलाय. देशाच्या राजधानीमध्ये कोरोना पीकच्या कालावधीमध्ये वापर करण्यात आलेला ऑक्सिजन आणि वापर झाल्याचा दावा करण्यात आलेल्या ऑक्सिजनच्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत कमिटीला आढळून आलीय. दिल्ली सरकारने गरजेपेक्षा चार पट अधिक ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा या कमिटीने केलाय.

सुप्रीम कोर्टाच्या ऑक्सिजन ऑडिट समितीने दिलेला अहवाल अस्तित्वातच नसून हा भाजपाने तयार केला आहे असा गंभीर आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला आहे. खोटा अहवाल तयार करुन भाजपा फक्त मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची बदनामी करत नसून केंद्राने ऑक्सिजनची योग्य व्यवस्था न केल्याने सदस्य गमावलेल्या कुटुंबीयांचादेखील अपमान करत आहेत असे सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

त्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या अहवालावर भाष्य केलेय. ‘माझा गुन्हा हा आहे की मी दोन कोटी नागरिकांच्या श्वासांसाठी लढलो’ असे ट्विट त्यांनी केलेय.

‘माझा गुन्हा हा आहे की मी दोन कोटी नागरिकांच्या श्वासांसाठी लढलो. जेव्हा आपण (पंतप्रधान नरेंद्र मोदी) पश्चिम बंगालसह इतर राज्यांत निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होतात. तेव्हा मी रात्रभर जागून ऑक्सिजनची तडजोड करत होतो. कोरोनाग्रस्त रुग्ण आणि इतर आजारांनी ग्रासलेल्या नागरिकांना ऑक्सिजन मिळावा यासाठी मी भांडलो, हात जोडले. ऑक्सिजनअभावी अनेकांनी त्यांच्या जवळच्या लोकांना गमावले आहे. त्यांना खोटारडे म्हणू नका. त्यांना खूप वाईट वाटतेय’ असे आवाहन केजरीवाल यांनी केलेय.

काय म्हटले आहे कथित अहवालात?
सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल करण्यात आलेल्या अहवालामध्ये दिल्ली सरकारने १४०० मेट्रीक टन ऑक्सिजन वापरण्यात आल्याचा दावा केला असला तरी ही आकडेवारी प्रत्यक्षात वापरण्यात आलेल्या ऑक्सिजनच्या चौपट असल्याचं म्हटलं आहे. बेड उपलब्धतेच्या सुत्रानुसार हा गोंधळ दिसून येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. दिल्लीमधील बेड्सच्या उपलब्धतेनुसार २८९ मेट्रीक टन ऑक्सिजन वापरला गेल्याचं सांगण्यात आलंय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!