Share

‘फटाके फुटायला सुरुवात झालीये, लिस्ट बरीच मोठी आहे!’

Published On: 

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) छापा टाकला आहे. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमजीत सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल कोश्यारी यांना पत्र पाठवले होते. त्यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसूल करण्याचे सांगितल्याचा आरोप केला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सीबीआयने सुमारे एका महिन्यांपूर्वी देशमुखांच्या घरावर छापा टाकला होता. तर आता ईडीनेही देशमुख यांच्या घरावर छापा टाकला आहे.

यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही भाष्य केले आहे. ‘फटाके फुटायला सुरुवात झालेली आहे, अनिल देशमुखजी. ही सुरुवात आहे, लिस्ट बरीच मोठी आहे…’ असे ट्विट भातखळकर यांनी केलेय.

तर दुसरीकडे काही दिवसात शिवसेना नेते अनिल परब यांचीही अशीच अवस्था होणार असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले आहे. या संदर्भात किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केलीय. ते म्हणाले की, ‘अनिल देशमुखच्या घरी आज ‘ईडी’ चे छापे पडल्याने त्यांची काही दिवसांनी जेलमध्ये रवानगी होणार. घोटाळ्याचा पैसा कोलकत्ता कंपन्याद्वारा स्वतःचा कंपन्यामध्ये वळविला. छगन भुजबळ अशाच प्रकारचा घोटाळ्यामुळे ३ वर्ष जेलमध्ये होते. काही दिवसांनी अनिल परबची अशीच अवस्था होणार.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!