नवी दिल्ली : देशातील कोरोनाची व्हायरसची दुसरी लाट हळूहळू मंदावत आहे. नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. गेले दोन दिवस नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ झाल्यानंतर आणि पुन्हा एकदा नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. पण असे असले तरीही दुसऱ्या बाजूला कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत.
डेल्टा प्लस व्हेरिएंटची तपासणी आणि हे थांबवण्यासाठी सरकार मोठ्या स्तरावर टेस्टींग का करत नाही? तसेच यावर लसी किती प्रभावी आहेत आणि याची संपूर्ण माहिती कधी उपलब्ध होईल?, तिसऱ्या लाटेत यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय योजना आहेत?, असे प्रश्न राहुल गांधी यांनी मोदी सरकारला विचारले आहेत.
डेल्टा प्लस वेरिएंट पर मोदी सरकार से प्रश्न-
– इसकी जाँच व रोकथाम के लिए बड़े स्तर पर टेस्टिंग क्यों नहीं हो रही?
– वैक्सीन इसपर कितनी प्रभावशाली हैं व पूरी जानकारी कब मिलेगी?
– तीसरी लहर में इसे नियंत्रित करने का क्या प्लान है?
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 25, 2021
दरम्यान, २३ जूनला सरकारच्या सुत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार, भारतात ४० डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळले होते. यापैकी सर्वाधिक महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आहेत.
कोरोना संक्रमणाचा सध्याचा कल कायम राहिला, तर कोरोनाचा अधिक संक्रमित होऊ शकणारा डेल्टा हा उपप्रकार हा ‘प्रबळ कुळ’ (डॉमिनंट लायनेज) ठरू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. आतापर्यंत ८५ देशांमध्ये डेल्टा आढळल्याची नोंद झाली असून तो जगातील अनेक ठिकाणी सापडतच आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तो काळा दिवस विसरता येणार नाही’, आणीबाणीवरून मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
- ‘नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली!’
- कबीर बेदींनी मुलाच्या आत्महत्यानंतर व्यक्त केलं दुःख
- ‘जर झेपत नसेल तर राजीनामा द्या’, सुप्रिया सुळेंनी महापौरांना सुनावले
- इतर पक्षातील नेते आपल्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा सर्वपक्षीय नेते का करत आहेत ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

